नाशिक : आगामी महापालिका निवडणुकासाठी शहरात विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या प्रचार सभा होत आहेत. तसेच निवडणूक तोंडावर आली की अनेक नेते पक्ष प्रवेश करतानाचे चित्र दिसते. असेच काहीसे चित्र नाशकात बघायला मिळत आहे. कारण भाजपमधील अनेक मोठे नेते हातात शिवबंधन बांधणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
नारी के सन्मान मै, शिवसेना मैदान मै; एकनाथ शिंदेंची उत्तर प्रदेशात गर्जना
शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल यांच्यावर आगामी निवडणुकीची जबाबदारी पक्षांनी टाकली आहे. परंतु त्यांच्या मातोश्री भीकुबाई बागूल या उपमहापौर आणि पुत्र मनीष हे सध्या भाजपयुमोचे शहाराध्यक्ष आहेत. ते आज मुंबईत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. वसंत गिते सध्या शिवसेनेत आहेत. परंतु त्यांचे पुत्र माजी उपमहापौर प्रथमेश गिते भाजपचे नगरसेवक आहेत. तसेच भाजपचे एक नगरसेवक हे आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहेत. त्यामुळे याचा मोठा फटका आगामी निवडणूकीत भाजपला बसण्याची शक्यता आहे.
शिवसेनेला अजून एक मोठा धक्का! यशवंत जाधवांच्या घरी आयकर विभागाचा छापा
भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची देखील प्रचार सभा अलिकडेच पार पडली. त्यात त्यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली होती. त्याच परिणाम की काय आता भाजपमधील नेत्यांना शिवसेनेने गळाला लावले आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील नाशिकच्या कार्यकर्त्यांनी काल भेट घेतली होती.
Read also:
- ‘डर्टी डझन’ यादी घेऊन किरीट सोमय्या दिल्लीत! पत्रकार परिषद घेऊन आणखी बॉम्ब फोडणार
- खिशाला धनुष्यबाण लावणाऱ्या शिपायांवर देखील हे धाड टाकतील – संजय राऊत
- किरीट सोमय्यांनी समोर आणली नवीन ‘डर्टी फोर्टीन’ यादी; ‘या’ दोन नेत्यांची नावे आली नव्याने समोर
- बार्बाडोसमधून भगोड्या चोक्सीला भारतात न आणणारे दाऊदला कधी आणणार ? शिवसेनेची रोखठोक सवाल
- ज्यांना सोडून जायचं आहे, त्यांनी आताच जा नाहीतर..; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना इशारा