मुंबई : ड्रग्स प्रकरणात एनसीबीकडून काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक करण्यात आली होती. 10 तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने कारवाई करत त्यांना अटक केली होती. त्यानंतर आज त्यांच्या घरावर देखील छापा टाकण्यात आला आहेय
समीर खान हे नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे पती आहेत. खान यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर मलिक यांनी ट्विट केले असून, आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याचे म्हटले आहे.
Nobody is above the law and it should be applied without any discrimination.
Law will take its due course and justice will prevail.
I respect and have immense faith in our judiciary.— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 14, 2021
नवाब मलिक यांनी ट्विट केले की, कायद्यापेक्षा कोणीही वरचढ नाही आणि कोणताही भेदभाव न करता ते लागू केले जावेत. कायदा योग्य वेळी घेईल आणि न्याय नक्की मिळेल. आम्ही न्यायव्यवस्थेचा आदर करतो आणि त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.
दरम्यान, ड्रग्ज प्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पे द्वारे पैसे पाठवल्याचा आरोप आहे. मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणाची चौकशी सुरु असताना हा व्यवहार समोर आला.
Read Also :
- एनसीबीकडून नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरावर छापा
- पुणे मेट्रोची वनाज ते गरवारे महाविद्यालय ट्रायल रन 15 ऑगस्टपूर्वीच, महापौरांनी दिली सुवार्ता
- ‘… तर मोदी आज आहेत त्यापेक्षा मोठे होतील’, सामनातून पंतप्रधानांना सल्ला
- ‘…तोपर्यंत मी बाबासाहेबांनी दिलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नाव जिवंत ठेवणार’
- तुकाराम मुंढेंची आता ‘या’ आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती