मुंबई : एनसीबीने क्रूझवर टाकलेल्या धाडीत भाजप नेत्याचा मुलगा होता की नाही हे अजून सिद्ध व्हायचं आहे. त्या आधीच नवाब मलिक आरोप करून मोकळे झाले आहेत, असं सांगतानाच नवाब मलिक यांच्या जावयालाही एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे मलिक यांनाही जबाबदार धरायचे का?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.
राज्यात लवकरच सत्ताबदल, शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात : बबनराव लोणीकर
प्रविण दरेकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. नवाब मलिक आरोप करून केवळ सनसनाटी निर्माण करत आहेत. कायदा हा सर्वांना समान असतो. त्यामुळे मुंबई पोलीस तुमच्याकडे आहे. तुम्हा कॉल रेकॉर्ड तपासू शकता. पण बेछूट आरोप करून मलिक कोणता तीर मारत आहेत?, असा सवाल करतानाच एनसीबीच्या धाडीत भाजप नेत्याचा मुलगा होता की नाही हे अजून सिद्ध व्हायचं आहे. पण मलिक यांच्या जावयाला एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे मलिक यांना जबाबदार धरायचे की राष्ट्रवादीला? असा सवाल दरेकर यांनी केला.
अजित पवारांसह बहिणींच्या कार्यालयांवर सलग तिसऱ्या दिवशीही आयकर छापे
सध्या ड्रग्जबाबत कारवाई केली जात आहे. ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. पण मलिक उगाच सनसनाटी निर्माण करत आहेत. व्हिडीओ आणि फोटो कॉर्प केला असावा. मला वाटतं या सर्व प्रकरणाचा तपास केल्याशिवाय बोलता येणार नाही. तपास होऊ द्या, असंही त्यांनी सांगितलं. मलिक यांच्या जावयाला अटक केल्यापासून ते विविध विधाने करत आहेत. भाजपला मुद्दाम बदनाम केलं जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.
अजित पवारांच्या समर्थनात पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन
यावेळी त्यांनी चिपी विमानतळाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. हा कोकणातील महत्त्वाचा प्रकल्प आहे. सर्वांना बरोबर घेऊन त्याचं उद्घाटन व्हायला हवं होतं. पण महाविकास आघाडी प्रत्येक गोष्टीत सर्व श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला आले असते तर श्रेय मिळालं नसतं म्हणून नाव टाकलं नाही, असा दावा करतानाच चिपीसाठी भाजपने मोठं योगदान दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Read Also :
- 11 ऑक्टोंबरच्या देशव्यापी आंदोलनाची सुरूवात महाराष्ट्रातून; शिवसेना पुर्ण ताकतीने सहभागी होणार
- एकत्र आलेत ठाकरे आणि राणे, मला आठवते युतीचे गाणे; रामदास आठवलेंची भन्नाट चारोळी
- बाळासाहेबांनी खोटं बोलणारांना शिवसेनेतून हाकलून लावलं; मुख्यमंत्री ठाकरेंचा राणेंवर हल्लाबोल
- मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री माझ्या कानात बोलले, मी एक शब्द एकला – नारायण राणे
- विमानतळ नको म्हणून आंदोलन करणारे आज मंचावर आहेत; नारायण राणेंचा रोख कुणाकडे?