सांगली – सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणात आता एक नवा वाद निर्माण झाला आहे. बँकेची नव्या वर्षाची डायरी नुकताच प्रकाशित करण्यात आली आहे. या डायरीत विधान परिषद यादीतून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव वगळण्यालाच्या धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली असून आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आणखी नव्या वादाला सुरवात झाल्याचे चित्र सध्या सांगलीत दिसू लागले आहे.
कोरेगाव भिमा पर्यटन स्थळापेक्षा शुरवीरांची भुमी म्हणून ओळखली जावी – नितीन राऊत
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०२२ या वर्षाची नवीन डायरी गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रकाशित केली. डायरीमध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार,बँकेचे संचालक यांची क्रमाने नावे आहेत. जिल्ह्यातील विधान परिषद सदस्यांची देखील यात नावे आहेत. मात्र विधान परिषद सदस्य असलेल्या गोपीचंद पडळकर यांचे नाव या डायरीतून वगळल्याचे उघड झाले. या नवीन डायऱ्यांचे सर्व संचालकांना वाटप केले आहे. संचालकांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या नवीन डायरी दिल्या आहेत . खासदार आणि आमदारांची नावे असताना गोपीचंद पडळकरांचे नाव नसल्याने पडळकर यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत.
नवाब मालिकांनी दोन ऑडिओ क्लिप ऐकवत पुन्हा फोडला बॉम्ब; समीर वानखेडेंवर केले ‘हे’ गंभीर आरोप
सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील आणि आ. गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीची सत्ता आहे. मात्र बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. पालकमंत्री आणि आमदार यांच्यातील वादामुळेच आमदार गोपीचंद पडळकर याचे नाव वगळल्याची चर्चाही सध्या जोरात रंगली आहे. आता आणखी नव्या वादाचे काय पडसाद उमटतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Read also:
- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा; यापुढे सर्व सरकारी वाहने असणार इलेक्ट्रिक
- ठाकरे – पाटील विवाहला लागली कोरोनाची नजर, आता अंकिता पाटील देखील कोरोना पॉझिटिव्ह
- राज्यपालांवर बंदूक ठेवून भाजपा महाराष्ट्रात राजकारण करत आहे – नाना पटोले
- पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जातीवाद; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
- “एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणा”; अजित पवारांचा नारायण राणेंना सल्ला