मुंबई – भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मुलगी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बंधू बिंदुमाधव ठाकरे यांच्या मुलाचा विवाहसोहळा मागील आठवड्यात पार पडला. विवाहसोहळ्याला बऱ्याच मोठ्या मोठ्या नेत्यांनी उपस्थिती दर्शविली होती.
महाविकास आघाडी सरकार हद्दपार करणार; नव्या वर्षी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा संकल्प
कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन २ मंत्री आणि २० आमदार कोरोनाबाधित झाले असल्याची माहिती दिली होती. यातील बऱ्याच जणांनी ठाकरे-पाटील विवाहसोहळ्याला उपस्थिती दर्शविली होती.
आज सकाळीच नववधू अंकिता पाटील ठाकरे यांनी स्वतःला कोरोना झाली असल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिताचे लग्न निहार ठाकरे याच्यासोबत झाले आहे. निहार हा बिंधुमाधव ठाकरे यांचा मुलगा आहे. या लग्नाला मंत्री,राज्यपाल अनेकांनी उपस्थिती लावली होती.
खासदार अमोल कोल्हे यांना डावलले त्यामुळेच शिवाजीराव आढळराव यांची बारी फसली?
अंकिता पाटील यांनी ट्विटरवर आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं की, आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी असंही आवाहन त्यांनी केलं.
Read also:
- राज्यपालांवर बंदूक ठेवून भाजपा महाराष्ट्रात राजकारण करत आहे – नाना पटोले
- पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जातीवाद; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
- “एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणा”; अजित पवारांचा नारायण राणेंना सल्ला
- “ओबीसींवर होणारा अन्याय दूर न झाल्यास मी मंत्रिपदाचा त्याग करणार”
- नवाब मालिकांनी दोन ऑडिओ क्लिप ऐकवत पुन्हा फोडला बॉम्ब; समीर वानखेडेंवर केले ‘हे’ गंभीर आरोप