सिंधुदुर्ग : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एका एकेरी उल्लेख करुणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायणे राणे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्हीही विरोधात असताना दौरे केले, पण जिल्हाधिकारी, तहसीलदार कुठे आहेत? अशी विचारणा आम्ही केली नाही, मात्र काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हाच प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही वापरली नव्हती”, असं अजित पवार म्हणाले.
आजोबांचा सल्ल्याकडे केला नातवानेच कानाडोळा, मग सल्ले फक्त फडणवीस आणि राज्यपालांसाठी?
दरम्यान, यावर आज सिंधुदुर्गात बोलताना, भाजप आमदार आणि नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला असून, “कुठली भाषा वापरावी हे अजितदादांनी सांगावं, हे म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा असं सांगण्यासारखं आहे. भाषेबच्या वापराबद्दल तर अजितदादांनी बोलूच नये”, अशी खोचक टीका केली आहे.
पुण्यातील रिंगरोडमुळे २५ टक्के प्रदूषणात घट; बाहेरून येणारी ६० ते ७० हजार वाहने कमी होणार
तसेच, रोहित पवारांच्या चिपळूण दौऱ्यावरही त्यांनी निशाणा साधला असून, “रोहीत पवारांनी आपल्या आजोबांकडून योग्य गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत ,त्यांचं ऐकलं पाहिजे. नातूच जर आजोबांचा विचार पाळत नसेल, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावे? असा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर निर्माण होतो,” या शब्दांत त्यांनी उपहासात्मक टीका केली आहे.
“आंतरविरोधाला सुरूवात झाली आहे, जेव्हा सरकार पडेल तेव्हा पर्याय देवू”; फडणवीसांचा पुनरुच्चार
दरम्यान, केंद्रीय मंत्री चिपळूण दौऱ्यावर असताना त्यांनी, “इथलं प्रशासन बेजबाबदार आहे. तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा,” असं म्हणत प्रशासनाला फैलावर घेतलं होतं.
Read Also :
- आस्मानी संकटात कोकणच्या मदतीला पश्चिम महाराष्ट्राचा सुपुत्र धावला! महेश लांडगे यांचा राज्यातील २८८ आमदारांसमोर आदर्श
- अधिकाऱ्यांना पाहण्यासाठी हे लोक दौरा करतात का? अजित पवारांचा नारायण राणेंवर निशाणा
- पक्ष बिक्ष काही नाही, सध्याचं संकट आणि त्यासाठीचं समर्पण महत्त्वाचं – पंकजा मुंडे
- राज्यात होत असलेल्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत; भाजप आमदाराचा दावा
- “आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही आघाडीला पाठिंबा का द्यावा?”