मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गेल्या कित्येक महिन्यांपासून, भाजपविरोधी पक्षाची मोट बांधण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता एक मोठी घडामोड घडून येत असून, आगामी उ.प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी-समाजवादी पक्षाने आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, यावर दिल्लीतील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना आमदाराचा १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“सपा-राष्ट्रवादी-राजदची आघाडी उ.प्रदेशात होत असेल, तर ही चांगलीच गोष्ट आहे, पण आमचे विचाराल तर, उ.प्रदेश बाबत आमची काही भूमिका नाही. त्यामुळे आम्ही या आघाडीला पाठिंबा का द्यावा? असा सवाल करत, “शिवसेना उ.प्रदेशातल्या निवडणूक निवडणूका स्वतंत्रपणे लढवेल. माझ्या आणि पक्षाच्या, त्यांच्या आघाडीला शुभेच्छा,” असं स्पष्टीकरण दिलं आहे.
राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे राज्यात पूर परिस्थिती – राज ठाकरे
त्यामुळे, स्वबळावर निवडणूक लढवून राम मंदिराच्या जोरावर इथल्या हिंदूंची मते जास्तीत जास्त स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न यातून शिवसेना करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, इथूनच युतीच्या नव्या पर्वाची देखील सुरुवात होण्यात काहीच अडचण येणार नाही. त्यामुळे आगामी काळात, सध्या भाजपचा विरोध करणारे हिंदुत्त्ववादी पक्ष एक येतात; की वेळ आल्यावर आपले खरे रंग दाखवतात, हे लवकरच कळेल.
700 कोटी हे राज्यसरकारचे, केंद्राचा यात काडी मात्र पण संबंध नाही – अजित पवार
दुसरीकडे, सध्या विरोधक संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र जमले असून, सगळे आपापल्या विचारधारांशी तडजोड करत भाजपविरोधी वातावरण आणि आघाडी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे, कालच्या काँग्रेस, डीएमके, राष्ट्रवादी, शिवसेना, राजद, सपा, सीपीआयएम, सीपीआय, नॅशनल कॉन्फरन्स, आम आदमी पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, आरएसपी, केरळा काँग्रेस (एम) आणि व्हिसीके पार्टीचे नेते, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या बैठकीतून दिसून आले आहे.
Read Also :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात, देश सुरक्षित नाही; संजय राऊत यांची टीका
- महापालिका रणधुमाळी : भाजपने काय केले याची पोलखोल करा, राज ठाकरेंचे आदेश
- राज्यातील लॉकडाऊन उठवण्याबाबत,आज मंत्री मंडळात निर्णय होण्याची शक्यता
- राज्य सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांचा कोर्टात दावा
- कार्यकर्त्यांची भावनिक हाक, पंकजा मुंडेंनी शिवसेनेत जावे, पक्षात मुंडेना खडसेंसारखी वागणूक