मुंबई : भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे सध्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आले आहेत. अलिकडेच त्यांचा ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात गावकऱ्यांना धमकी देणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरून त्यांच्यावर कडाडून टिका करण्यात आली. तसेच त्यांनी लव्ह जिहादवर देखील आक्रमक भूमिका घेतली होती. याच संदर्भात राष्ट्रवादीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मतदारांना, पोलीस यंत्रणेला धमक्या देणाऱ्या नितेश राणेंवर कारवाई करणार का ? असा सवाल केला आहे.
शिंदे-फडणवीस सरकार उद्या मंत्र्यांना घेऊन दिल्ली जाण्याची शक्यता..!
सिंधुदुर्ग येथील नांदगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीवरून गावकऱ्यांना नितेश राणे यांनी धमकी दिली होती. माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर एक रूपायचा निधी देखील देणार नाही. असं नितेश राणे यांनी गावकऱ्यांना म्हटलं.तसेच आता राज्यात गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत. हे कट्टर हिंदुत्ववाद्याचं सरकार आहे. त्यामुळे याठिकाणी आम्ही खपवून घेणार नाही. असंही ते म्हणाले होते. तसेच त्यांनी हिंदू विराट मोर्चात अनेक भडकाऊ भाषणं देखील केली होती. यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी नितेश राणेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
फडणवीसांची जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू..! मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे-फडणवीसांचे मोठे निर्णय
पाहिजे तेव्हा मोर्चा काढणार, हवं तसं घरी जाणार, पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा घातला तरी पोलीस माझं काहीही करू शकत नाही. असं म्हणत आमदार नितेश राणेला सत्तेचा माज चढलाय. पोलीस यंत्रणेला उघड उघड दम देत असतांना मुख्यमंत्री, गृहमंत्री काय करतात? कायदा फक्त सामान्य माणसाला आहे का? असा सवालही रविकांत वरपे यांनी केला आहे. महाराष्ट्रत सत्ताधाऱ्यांनी गुंडशाही चालविली असल्याची टिकाही त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.
चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्याची अन् पत्रकाराची हत्तीवरून मिरवणुक काढणार
दरम्यान, अलिकडेच नितेश राणे यांनी पोलीसांना देखील धमकी दिली होती. तसेच माझं कुणीही काहीही करू शकत नाही. कारण आमचं सरकार सत्तेत आहे. त्यामुळे मला हवं तसं करेन, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. त्यावरून विरोधकांनी भाजपवर जोरदार टिका केली.
Read also
- पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची ‘ॲलर्जी’, शहरातील फ्लेक्स, कार्यक्रमांच्या होर्डिंग, जाहिरातीतून गायब
- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद..! “फडणवीसांनी पहिल्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं कान उपटले पाहिजे”
- “कितीही काहीही झालं तरी ठाकरे गटासोबतच..!” राजन साळवींना एसीबीची नोटीस, चौकशी होणार
- 70 हजार कोटींच्या 13 प्रकल्पांना मंजूरी..! राज्यात शिंदे-फडणवीसांची गाडी जोरात, आघाडी कोमात
- शिंदे-फडणवीसांचा मास्टर फ्लॅन..! तब्बल 30 वरिष्ठ पोलील अधिकाऱ्यांच्या एका रात्रीत बदल्या