मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर वेदांता, फॉक्सकाॅन प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेल्याने विरोधकांनी राळ ओढली होती. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांना जोरदार आरोप-प्रत्यारोपांवरून चांगली जुंपली होती. यातच काल शिंदे -फडणवीस सरकारने राज्यात तब्बल 70 हजार कोटी रूपये गुंतवणुकीच्या 13 प्रकल्पांना मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यावरून आता भाजपचे आमदार आणि मुंबई शहाराध्यक्ष आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टिकास्त्र सोडलं आहे.
“साहेबांना जीवे मारण्याची धमकी तर अदखलपात्र गुन्हा, अन् पाटलांवर शाई फेक, खुनाचा प्रयत्न”
कोणताही नवा प्रकल्प आली की, सर्वात आधी विरोधाचा झेंडा विरोधक फडकवत असतात, आणि रोजगार गेला म्हणून उलट्या बोंबाही मारतात. पंरतु आता राज्यातील सरकार बदलले आहे. महाराष्ट्रातील चित्रही बदलते आहे. आता स्वार्थी कट कमिशनचे उद्योग बंद झाले असून रोजगार देणारे उद्योगांचे दार खुले झाले असल्याची बोचरी टिका आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.
शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय…! पिंपरी-चिंचवडकरांसाठी केले तब्बल ९९५ कोटी मंजुर
55 हजार रोजगार निर्मिती करणाऱ्या 70 हजार कोटींची महागुंतवणुकीच्या 13 प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून एकीकडे राज्य सरकार एवढे मोठे निर्णय घेते आहे, तर दुसरीकडे डावोस रिटर्न पेग्विंन सेनाप्रमुख रोजगार निर्मिती होत नाही म्हणून भाषणबाजी करतात. असं म्हणत अहो, कुठल्या अज्ञानवनात आहात? असा खोचक सवालही आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.
“हिवाळी अधिवेशन सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरू व्हावे”; अजित पवारांची मागणी
दरम्यान, टाटा एअरबस, फॉक्सकॉन, वेदांता प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेल्याने शिंदे सरकारवर जहरी टिका करण्यात आली. त्यामुळे आता शिंदे सरकारने विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देत मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे भागांतील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. यामध्ये 55 हजार रोजगार निर्माण होतील अशा 70 हजार कोटी रूपयांच्या 13 प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे.
◆कोणताही नवा प्रकल्प आला की, सर्वात आधी विरोधाचा झेंडा हे फडकवणार आणि रोजगार गेला म्हणून उलट्या बोंबा मारणार!
◆ आता सरकार बदलले… महाराष्ट्रातील चित्र ही बदलते आहे.
◆ आता स्वार्थी “कट कमिशनचे” उद्योग बंद, रोजगार देणारे उद्योगांचे दार खुले!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 14, 2022
Read also
- शिंदे-फडणवीसांचा मास्टर फ्लॅन..! तब्बल 30 वरिष्ठ पोलील अधिकाऱ्यांच्या एका रात्रीत बदल्या
- शिंदे-फडणवीस सरकार उद्या मंत्र्यांना घेऊन दिल्ली जाण्याची शक्यता..!
- फडणवीसांची जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू..! मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे-फडणवीसांचे मोठे निर्णय
- चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्याची अन् पत्रकाराची हत्तीवरून मिरवणुक काढणार
- “पुण्यातील मुक मोर्चानंतर उदयन राजे खासदारकीचा राजीनामा द्यायला दिल्लीला”