सिंधुदूर्ग : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजापुरचे आमदार राजन साळवी यांची आज एसीबी कार्यालयात चौकशी होणार आहे. राजन साळवी यांनी त्यांच्या मालमत्तेसंदर्भात एसीबीने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नोटीस पाठविली होती. मात्र त्यांनी अधिक वेळ मागवून घेतला होता. त्यानुसार आज त्यांची अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशी होणार आहे. त्याआधी त्यांनी माध्यामांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“पुण्यातील मुक मोर्चानंतर उदयन राजे खासदारकीचा राजीनामा द्यायला दिल्लीला”
आर्थिक मालमत्तेसंदर्भात मला नोटीस आली होती. त्यानुसार आज मी एसीबी कार्यालयात चौकशीसाठी जात आहे. पंरतु निश्चितपणे मला चौकशीची अजिबात काही चिंता नाही. याचं कारण म्हणजे संपुर्ण जिल्ह्याला माहिती आहे की, मी निर्दोष आहे. अशा अनेक नोटीसा मला या अगोदर आल्या. परंतु त्याला मी कधीही भीक घातली नाही. असं राजन साळवी म्हणाले.
“साहेबांना जीवे मारण्याची धमकी तर अदखलपात्र गुन्हा, अन् पाटलांवर शाई फेक, खुनाचा प्रयत्न”
राजकारणापलीकडे मी एका व्यावसायिक आहे. माझ्या व्यावसायसातील सगळी माहिती शासनाकडे दिली आहे. त्यामुळे एसीबीला जी काही माहिती लागेल ती देण्याचा मी प्रयत्न करेन. तसेच चौकशीमधून काहीच निघणार नाही. अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर राजन साळवी याला काही महत्व नाही तर माझ्यापाठी शिवसेना हे नाव असल्यानं मला महत्व असून मागील काही वर्षापासून माझ्या पाठीशी संपुर्ण जिल्हा आहे. ही नोटीस आल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी फोन करून मला पाठिंबा दिला असून माझ्या पाठीशी संपुर्ण शिवसेना, संपुर्ण कुटुंब आहे. त्यामुळे लढणार आणि जिंकणारही ही शिकवण घेऊन आम्ही चौकशीला सामोरं जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय…! पिंपरी-चिंचवडकरांसाठी केले तब्बल ९९५ कोटी मंजुर
दरम्यान, उद्धव ठाकरे यांना देखील मागील काही दिवसात आर्थिक मालमत्तेसंदर्भात चौकशीची नोटीस आली होती. त्यातच आता ठाकरे गटातील आमदाराला चौकशीसाठी नोटीस येत असल्याने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. तसेच कितीही काही झाले तरी आपण ठाकरे गटासोबतच राहणार असल्याचं राजन यांनी सांगितले आहे.
Read also
- 70 हजार कोटींच्या 13 प्रकल्पांना मंजूरी..! राज्यात शिंदे-फडणवीसांची गाडी जोरात, आघाडी कोमात
- शिंदे-फडणवीसांचा मास्टर फ्लॅन..! तब्बल 30 वरिष्ठ पोलील अधिकाऱ्यांच्या एका रात्रीत बदल्या
- शिंदे-फडणवीस सरकार उद्या मंत्र्यांना घेऊन दिल्ली जाण्याची शक्यता..!
- फडणवीसांची जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू..! मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे-फडणवीसांचे मोठे निर्णय
- चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्याची अन् पत्रकाराची हत्तीवरून मिरवणुक काढणार