मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध पुणे क्राईम ब्रँचकडून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून, त्यामुळे राणे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नितेश राणे आणि नीलम राणेंच्या नावाने DHFL कंपनीकडून घेतलेलं ६५ कोटींचं कर्ज थकवण्यात आल्याने कंपनीकडून तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर त्यांच्यावर कारवाई केली गेली आहे.
ब्रेकिंग! नितेश राणे आणि नीलम राणेंविरोधात पुणे पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी
दरम्यान, या कारवाईनंतर आता आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून, “कर्जखातं मुंबईतल्या बँकेत आहे, मग पुणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस का बजावली? ५ महिने आधीच लोन सेटलमेंटसाठी बँकेला पत्र दिले आहे. तरी देखील आम्हाला ही नोटीस का बजावण्यात आली?” असे सवाल करत, “हा पूर्ण राजकारणाचा भाग आहे, असा जोरदार आरोप त्यांनी केला आहे. तसेच यासंबंधी त्यांनी दोन ट्विट देखील केले आहेत.
— nitesh rane (@NiteshNRane) September 9, 2021
तसेच, “ही नोटीस ‘एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया’ला देण्यात आलं आहे. आम्ही याविरोधात हायकोर्टात दाद मागणार आहोत. कारण याला काहीच अर्थ नाही. जे लोन आम्हाला ५ महिन्यांपूर्वी भरायचं होतं, त्यासाठी आत्ता नोटीस काढून काहीच अर्थ नाही. हे ठाकरे सरकार आम्हाला घाबरलं आहे,’ असं म्हणत, ‘नोटीस काढायचीच असेल, तर नंदकिशोर चतुर्वेदी नावाचा व्यक्ती गेल्या चार महिन्यांपासून गायब आहे. त्याची काढा,” असं ते म्हणाले.
Nandkishor Chaturvedi who is apparently missing for months now or rather absconding..
has been a partner with Min Aditya T ..
Shudnt Pune crime branch where this person is ?
A LOC shud be issued here too so Aditya T doesn’t fly out of the country..
What’s the mystery?? pic.twitter.com/MeAPkNJNYI— nitesh rane (@NiteshNRane) September 9, 2021
गिरीश महाजन म्हणाले, ‘ती माझी चूक झाली, मी मान्य करतो’
“मंत्री आदित्य ठाकरे आणि नंदकिशोर चतुर्वेदी यांचे व्यावसायिक संबंध आहेत. त्यामुळे, लूकआऊट नोटीस काढायचीच असेल तर आदित्य ठाकरेंवर काढायला हवी, की नंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहे? माझ्याकडे सगळी कागदपत्र आहेत. २०१९ पर्यंत आदित्य ठाकरे आणि ते एकाच कंपनीत भागीदार होते. अश्या व्यक्तीबद्दल तुम्ही नोटीस काढा ना! गेल्या चार महिन्यांपासून तो कुठे गायब आहे? यांची अनेक प्रकरणं आमच्याकडे आहेत,” असं थेट आव्हानच त्यांनी ठाकरे सरकारला दिलं आहे.
Read Also :
- साताऱ्यात उदयनराजे-शिवेंद्रराजे समर्थकांत तुफान राडा, ६ गंभीर जखमी १६ जणांविरोधात गुन्हा
- परमबीर सिंग आणि भाजपचं साटंलोटं? नवाब मलिकांनी केला गंभीर आरोप
- भुजबळ म्हणतात, सत्य परेशान होता है, पराजित नहीं! सोमय्या म्हणतात, आगे आगे देखो, होता है.!
- अजित पवार जरंडेश्वर कारखान्याची कागदपत्रं उघड करण्याची हिंमत का दाखवत नाहीत? – किरीट सोमय्या
- राष्ट्रवादीच्या बैठकीवर आणि मुख्यमंत्री-पवार यांच्या भेटीवर अजित पवार म्हणतात…