मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्याने तर राज्यातील राजकीय गणित बदलले आहेत. यातच आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीवरती दावा ठोकल्याने राज्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट असा तयार झालाय. नाशिक मध्ये दोन गटात प्रचंड राडा देखील झाला. यातच आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून मोठे गौप्यस्फोट करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा हा भाजपला देण्याचा निर्णय घेतला होता परंतु ते पत्र जयंत पाटलांनी शरद पवारांकडे पाठवलंच नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. यातच दिलीप बनकर यांनी शरद पवारांना सोडून भाजपसोबत सरकार स्थापन करा असंही आव्हाडांनी म्हटलं. त्यावर आता दिलीप बनकर यांनी पलटवार केला आहे.
हेही वाचा…अजित पवार वित्तमंत्री झाले तर विरोधकांच्या कामांना स्थगिती देणार का ?
दिलीप बनकर यांनी कुठलेही पत्र या ठिकाणी जयंत पाटलांना दिलेले नाही किंवा पवार साहेबांना दिलेले नाही. पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते आहेत. ते आमचे मित्र तुल्य आहे. त्यामुळे जे काही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी सांगितले होते. मी त्यांना आव्हान देतो की, दिलीप बनकरांनी एक पत्र पवार साहेबांच्या नावाने दिलेले दाखवा. त्याची स्वाक्षरी दाखवा. ज्या दिवशी माझं पत्र असेल दाखवतील, त्या दिवशी दिलीप बनकर राजकारणात निवृत्त होईल, असं दिलीप बनकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे मैदानात, महाराष्ट्र दौऱ्याचा कार्यक्रम ठरला
दरम्यान, राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी काल एक राष्ट्रवादीबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला होता. एकनाथ शिंदे गुहाटी ला असताना राष्ट्रवादीच्या 54 पैकी 51 आमदारांच्या भाजपला पाठिंबा देण्याचं आमदारांचं सह्यांचे पत्र तयार करण्यात आला होता. असं प्रफुल पटेल यांनी म्हटलं होतं. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपली प्रतिक्रिया देतानी यावर भाष्य केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांचा राष्ट्रवादीत बंड..! “हा” अख्खा जिल्हा शरद पवारांच्या पाठीमागे उभा राहिला
हेही वाचा…भाजपला पाठिंबा देण्याचे ते पत्र जयंत पाटलांनी दिलंच नाही, शरद पवारांना एकटं सोडण्याचा होता प्लॅन
हेही वाचा…राष्ट्रवादीत संघर्ष पेटला..! दोन गटात मोठा राडा, शरद पवार अन् अजित पवार गट आमनेसामने
हेही वाचा…“माझ्या परवानगीशिवाय फोटो वापरू नका,” शरद पवारांचा अजित पवारांना “दे धक्का”
हेही वाचा…“मुख्यमंत्री ‘या’ नात्याने अंतिम निर्णय ‘एकनाथ शिंदे’ घेतील”, पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया