पुणे : राज्यात गेल्या काही दिवसापासून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐैराणीवर आला आहे. मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकातून पनवेल कडे जाणाऱ्या लोकलमध्ये एका २० वर्षीय तरूणीवर अत्याचार करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत असल्याचं सांगत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सुळेंवर पलटवार केला आहे.
हेही वाचा…“सुवर्णा करंजेंनी संजय राऊतांच्या भोंग्याला खरी जागा दाखवली”, नरेश म्हस्केंचा राऊतांवर हल्लाबोल
संतापजनक असं सांगत चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक घटना आहे.यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे. या घृणास्पद घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपासयंत्रणांनी कार्यवाही करणे गरजेचे असल्याचं सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे.
हेही वाचा…“अनिल बोडेंनी आपली लायकी पाहून बोललं पाहिजे,” एकनाथ शिंदेंसाठी बच्चू कडू सरसावले
सुप्रिया सुळे यांच्या ट्विटवर चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे. अहो महाराष्ट्राच्या मोठ्या ताई, काविळ झालेल्यांना जग जसं पिवळं दिसतं तसं तुमचं झालं आहे. सत्तेचा स्ट्राईक रेट कमी झाल्याचा हा परिणाम आहे हे आम्ही समजू शकतो. पण लोकलमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याचं एवढं मोठं स्टेटमेंट करण्याआधी मोठ्या ताईंनी थोडी शहानिशा तरी करायला हवी असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“सगळ्यांची कुंडली माझ्याकडे आहे, तुम्ही पक्षासाठी चांगलं काम करा”, एकनाथ शिंदेंचा थेट इशारा
दरम्यान, पीडित तरूणीवर बलात्कार झाला नसल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी अधिकृत प्रेस नोट देखील काढली आहे. नवाज करीम शेख या व्यक्तींनी पीडित तरूणीशी लगड करण्याचा प्रकार केला असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. या तरूणाला पोलिसांनी अटक केली असून तो बिहारचा असल्याचं सांगण्यात आले आहे.
संतापजनक!
चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक घटना आहे.यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता…— Supriya Sule (@supriya_sule) June 15, 2023
अहो महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई, काविळ झालेल्यांना जग जसं पिवळं दिसतं तसं तुमचं झालंय. सत्तेचा स्ट्राईक रेट कमी झाल्याचा हा परिणाम आहे हे आम्ही समजू शकतो पण लोकलमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याचं एवढं मोठ्ठं स्टेटमेंट करण्याआधी मोठ्ठ्या ताईंनी थोडी शहानिशा तरी करायला हवी होती…… pic.twitter.com/dbGaA6TEhk
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 15, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“एकमेकांच्यामध्ये कशाला अंतर पाडण्याचा प्रयत्न करताहेत”,शिंदे-फडणवीसांच्या नाराजीच्या प्रश्नावर अजित पवार भडकले
हेही वाचा…“हे फेविकॉल का जोड है..! तुटेगा नही..! आमची जोडी जयविरूसारखी”, एकनाथ शिंदे
हेही वाचा…नाराजीच्या चर्चा, फडणवीसांची विरोधकांना चपखल, “तुम्ही आमच्या प्रवासाची चिंता करू नका”
हेही वाचा…“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्याचं नात नवरा-बायकोसारखं, त्यांना समाजाला घाबरून ‘घटस्फोट’ घेता येत नाही”
हेही वाचा…शिंदे-फडणवीस वाद पालघरला पोहचला, एकाच गाडीतून जाण्यास फडणवीसांचा नकार