मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची नेत्यांची रिग अजूनही थांबलेली नाही. यातच काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांच्या सुवर्णा करंजे ह्या अंत्यत निकटवर्तीय मानल्या जातात. वर्षा या शासकीय निवासस्थानी त्यांनी एकनाथ शिंदेच्या उपस्थित प्रवेश केला आहे. खासदार संजय राऊतांना अटक झाल्यानंतर सुवर्णा करंजे या शिवसेनेच्या विरोधात आक्रमक झालेल्या दिसल्या होत्या. त्यानंतर काही महिन्यांतच सुवर्णा करंजे यांचा शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…आधी थेट फडणवीसांना आव्हान! आता पुन्हा करणार भाजपमध्ये प्रवेश, आशिष देशमुखांनी काढला मुहूर्त
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून शिवसेना निर्माण झाली होती आणि शिवसेना हिंदुत्वाचा विचार सोडून काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या वरचळणीला ज्यांनी बांधली. त्यांच्या घराजवळी त्यांच्या विभागातील नगरसेविका सुवर्णाताई करंजे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे आणि शिवसेना त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभी राहणार आहे. त्या विभागात खऱ्या अर्थाने शिवसेना कशी आहे, करंजे यांच्या नेतृत्वाखाली दिसणार आहे. त्या सकाळच्या भोंग्याला त्याची जागा आपण दाखवलेली आहे. स्वत:च्या विभागातील नगरसेवक सुद्धा आता सोडून चाललेले आहेत. असंही नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…नवनीत राणांच्या विरोधात राष्ट्रवादी ‘हा’ तगडा उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंचाही बदला घेणार ?
दरम्यान, मागील अडीच वर्षात पुर्ण सामाजिक, विकासाची कामकाज बंद होतं. पंरतु आम्ही आल्यानंतर सगळे स्पीड ब्रेकर बाजूला केले. महाराष्ट्रात सगळे प्रकल्प सरू केलेत. राज्यात सर्वसामान्य लोकांचे जेव्हा डोळ्यासमोर ठेवून काम करू लागतो त्यावेळेस मग अशा प्रकारची काम आपल्या हातून होतात. त्यामुळे इतर संपुर्ण राज्यातले नगरसेवक, पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, लाखो लोक शिवसेनेत येत आहेत. अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अनिल बोडेंनी आपली लायकी पाहून बोललं पाहिजे,” एकनाथ शिंदेंसाठी बच्चू कडू सरसावले
हेही वाचा…“सगळ्यांची कुंडली माझ्याकडे आहे, तुम्ही पक्षासाठी चांगलं काम करा”, एकनाथ शिंदेंचा थेट इशारा
हेही वाचा…एक साध्या पोलीस ऑफिसरकडे इतकी मालमत्ता कशी? अजित पवारांनी थेट यादीच वाचून दाखवली
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का..! संजय राऊतांच्या निकवर्तीयांनी केला शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…“५० कुठं अन् १०५ कुठं? देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है.!” भाजपने शिंदेंना डिवचलं, महायुतीत मिठाचा खडा