मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची नेत्यांची रिग अजूनही थांबलेली नाही. यातच काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. याचा मोठा धक्का उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मानला जात आहे.
हेही वाचा…महायुतीत ठिणगी…! एकनाथ शिंदेंना ठाणे म्हणजे संपुर्ण महाराष्ट्र वाटलं का ? भाजपच्या खासदाराचा सवाल
खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांच्या सुवर्णा करंजे ह्या अंत्यत निकटवर्तीय मानल्या जातात. वर्षा या शासकीय निवासस्थानी त्यांनी एकनाथ शिंदेच्या उपस्थित प्रवेश केला आहे. खासदार संजय राऊतांना अटक झाल्यानंतर सुवर्णा करंजे या शिवसेनेच्या विरोधात आक्रमक झालेल्या दिसल्या होत्या. त्यानंतर काही महिन्यांतच सुवर्णा करंजे यांचा शिवसेनेत प्रवेश केला आहे.
हेही वाचा…“राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी मनसैनिकांनी हनुमानाला घातला नवस,” राष्ट्रवादीची टिका
दरम्यान. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुवर्णा कारंजे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत यांनी त्यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. तर कारंजे यांनी पक्षात प्रवेश करताच त्यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“५० कुठं अन् १०५ कुठं? देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है.!” भाजपने शिंदेंना डिवचलं, महायुतीत मिठाचा खडा
हेही वाचा…आधी थेट फडणवीसांना आव्हान! आता पुन्हा करणार भाजपमध्ये प्रवेश, आशिष देशमुखांनी काढला मुहूर्त
हेही वाचा…नवनीत राणांच्या विरोधात राष्ट्रवादी ‘हा’ तगडा उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंचाही बदला घेणार ?
हेही वाचा…जाहिरात देणारा हितचिंतक कोण, जाहिरातीचे पैसे कुणी दिले? अजित पवारांचा सवाल
हेही वाचा…राज्यात फडणवीसांच्या सभांचा सिलसिला सुरू होणार, भाजपने मोठी रणनीती आखली