मुंबई : राज्यात आगामी काही काळात निवडणुकांचा हंगाम सुरू होणार असून राजकीय सभांचा धुराळा उडणार आहे. यातच आता २० ते ३० जून या दहा दिवसाच्या दरम्यान भाजपकडून समर्थन अभियान सुरू करण्यात येणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहा सभा होणार आहेत. अशी माहिती भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
हेही वाचा…“शिवसेना-भाजप वाद मिटवण्यासाठी शिंदे समिती नेमणार”, शिवसेनेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेपर्यंत शांत बसणार
समर्थन अभियान भाजपकडून राबवण्यात येणार असून या दरम्यान भाजपच्या एकूण ३५ सभांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रभावशाली व्यक्तींना भेटणं, घराघरात जाऊन संपर्क करणं, मोदींच्या कार्यकिर्दीची माहिती देणे असा कार्यक्रम होणार असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. यामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्याही सभा होणार आहेत.
हेही वाचा…महायुतीत ठिणगी…! एकनाथ शिंदेंना ठाणे म्हणजे संपुर्ण महाराष्ट्र वाटलं का ? भाजपच्या खासदाराचा सवाल
राज्यातील 48 लोकसभेपैकी आम्ही जवळपास या ठिकाणी 35 एक सभांचे नियोजन या ठिकाणी झालेला आहे. पहिल्या टप्प्यातल्या एक ते दहा तारखेचे जे कार्यक्रम होते ते अत्यंत यशस्वी झालेले आहेत. आता राहिलेले कार्यक्रम टिफिन बैठक आमच्या आमदार खासदारांच्या सुरू आहेत. 21 तारखेला योग दिवस , 23 जूनला डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतिदिन बलिदान दिवस म्हणून त्या ठिकाणी होणार आहे. आणीबाणी दिवस 25 जून आणि मन की बात 23 जून आहे. अशा प्रकारे आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहेत आणि शेवटी 20 ते 30 जून असा संपर्क असे समर्थक व प्रभावशाली व्यक्तींना भेटणं घराघरात जाऊन संपर्क करणं मोदी साहेबांच्या कारकीर्दीची माहिती देणे असा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे.
हेही वाचा…“राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी मनसैनिकांनी हनुमानाला घातला नवस,” राष्ट्रवादीची टिका
दरम्यान, अमित शहा यांची नांदेड येथे सभा पार पडली. त्यानंतर महाराष्ट्रात एक माहोल निर्माण झाला असून आता देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचा सिलसिला सुरू होणाह आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच केंद्रीय मंत्र्यांसह गिरीश महाजन, आशिष शेलार, यांच्याही सभा होणार असल्याचं दरेकरांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपच्या खासदाराशी शिंदेंचा एकटा वाघ नडला, थेट औकातच काढली
हेही वाचा…राष्ट्रवादीपाठोपाठ आता भाजपलाही BRS ने सुरूंग, माजी जिल्ह्याध्यक्षाचा बीआरएसमध्ये प्रवेश
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंबाबत बेडकाची भाषा शिंदे गटाने कदापी खपवून घेऊ नये”
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंसोबत फडणवीसांची तुलना , हे थोडं अचंबित करणारं”, बावनकुळे
हेही वाचा…“नुसत्या नकला करून मुख्यमंत्री होता येत नाही”, आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला