छत्रपती संभाजीनगर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस असून सकाळपासून राजकीय नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी छत्रपती संभाजीनगरात महाआरती करण्यात आली आहे. यातच दादरमध्ये राज ठाकरे यांच्या लागलेल्या बॅनरवरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“कमी मार्काने पास झालो हे जाहिरातबाजीतून सांगणारा शिंदेंचा पहिलाच पक्ष”,सुप्रिया सुळेंनी उडवली शिंदेंची खिल्ली
राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी छत्रपती संभाजीनगरता मनसैनिकांकडून महाआरती करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी हनुमानाला नवसही केला आहे. सुपारी हनुमानाला मनसे सैनिकांकडून राज ठाकरे मुख्यमंत्री बनावेत असा नवस करण्यात आला आहे. तर रायगड जिल्हाप्रमुख जितू पाटील यांनी आणलेल्या केकवर औरंगजे आणि भोंग्याचे चित्र पाहायला मिळालं.
हेही वाचा…“शिवसेना आमचीच दावा करणाऱ्यांनी बाळासाहेबांचा फोटो वगळला, हा त्यांचा अपमान नाही का ?” अजित पवारांचा सवाल
यातच दादरमध्ये राज ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले आहे. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना डिवचलं आहे. राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले आहे. त्यांना शुभेच्छा, आता त्यांच्याकडे एकच आमदार आहे. हा आकडा ५० पर्यंत न्यावा लागेल. नुसत्या नकला काढून होणार नाही. असा चिमटाही आव्हाडांनी ठाकरेंना काढला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“४८ मतदारसंघापैकी हे २१ लोकसभा मतदारसंघ काॅंग्रेससाठी पोषक”, काॅंग्रेसचा निवडणुकीसाठी रोडमॅप ठरला
हेही वाचा…केंद्रात ‘मोदी’ भाकरी फिरवणार, महाराष्ट्रात ‘या’ राज्यसभेच्या खासदारांना औटघटका ?
हेही वाचा…“इजा कानाला झालेली नव्हती तर मनाला झाली होती, त्यामुळेच आज पुन्हा नवीन जाहिरात”
हेही वाचा…शिरूर लोकसभेसाठी महेश लांडगे लागले कामाला..! ओझरमध्ये “श्री गणेशा”, सोबतीला भाजपची फौज
हेही वाचा…“महाराष्ट्रातच नाही तर या राज्यांतही मित्रपक्षांचं भाजपसोबत बिनसलं” मोदींना मोठा धक्का बसण्याची शक्यता