मुंबई : राष्ट्रात मोदी तर महाराष्ट्रात शिंदे आशा आशायाची जाहिरात आज शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून लावण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला डिवचण्याचा प्रयत्न शिंदेंकडून करण्यात आला आहे. यावरून आता राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपला डिवचण्यात आलं आहे.
हेही वाचा…“अब्दुल सत्तार अन् घोटाळ्यांचे घनिष्ट नाते काही संपेना”, आणखी एक घोटाळा उघड
कमी मार्काेन पास झालो हे कबूल करणारा हा पहिला पक्ष आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातीची खिल्ली उडवली. जाहिरातीद्वारे महाविकास आघाडीचे सुगीचे दिवस आले असल्याचे सत्ताधाऱ्यांनी दाखवून दिले आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ आणि सत्तेत असलेल्या सरकारचे अपयश वर्तमानपत्रातील जाहिरातबाजीवरून दिसतेय. २०२४ मध्ये महाविकास आघाडीचे रयतेचे राज्य आणण्यासाठी सर्वांनी तयारीला लागावे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…मनसेच्या फायर ब्रॅंड नेत्याचे ‘भावी खासदार’ म्हणून लागलेत बॅनर्स, लोकसभा पोटनिवडणुकीत मनसेची उडी
दरम्यान, शिवसेनेकडून आज बहुतांश वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात देण्यात आली असून याध्यमातून सरकारच्या कामगिरीवर जनतेने शिक्कामोर्तब केल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट तुलना कधीही करण्यात आली नव्हती, मात्र जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना 26.1 टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के लोकांची पसंती असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शिवसेना आमचीच दावा करणाऱ्यांनी बाळासाहेबांचा फोटो वगळला, हा त्यांचा अपमान नाही का ?” अजित पवारांचा सवाल
हेही वाचा…राज्यात आज निवडणुका झाल्यास काय होणार ? सर्वात मोठा एक्झिट पोल आला पुढे, शिंदेंचं काय होणार?
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला छ.संभाजीनगरचे वावडे..! औरंगाबादचं नामांतराचा पडला विसर
हेही वाचा…मोदींना जिंकवण्यासाठी भाजप ‘ह्या’ खासदारांचे तिकीट कापणार, बड्या नेत्याचं वक्तव्य
हेही वाचा…शिंदे गटाची ‘ती’ जाहिरात भाजपला रूचली नाही, महायुतीत मिठाचा खडा