पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची तयारीही राज्यातील राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. यातच या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीत आपापले उमेदवारही ठरले आहेत. यातच आता या पोटनिवडणुकीत मनसेही उडी घेतली आहे.
हेही वाचा…गद्दार सरकारची वर्षपुर्ती येतेय, तुम्ही जरा सांभाळून रहा एकनाथ शिंदे टोला
पुण्यातील मनसेचे फायर ब्रॅंड नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांचे भावी खासदार म्हणून बॅनर्स झळकले आहेत. त्यामुळे पुण्याच्या पोटनिवडणुकीत मनसेही तयारी करीत असल्याचं दिसत आहेत. पुण्यातील सिंहगड परिसरात वसंत मोरे यांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनर्स लावण्यात आले आहेत.
हेही वाचा…“शरद पवारांचा वैचारिक व्हायरस संपवणार,” गुणरत्ने सदावर्तेंची टिका, नथूराम गोडसेचाही कार्यक्रमात फोटो लावला
दरम्यान, राष्ट्रवादीकडून शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांचंही नाव चर्चेत असून त्यांचेही बॅनर्स लावण्यात आले होते. तर भाजपकडून गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वराधा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक यांच्या नावाची चर्चा आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“एक वकत नागोबाला मिठी मारा पण ह्या कमबाळाबाईला नगं.!”, राष्ट्रवादीचा सदाभाऊ खोत यांना टोला
हेही वाचा…फडणवीसांना २३. २ तर शिंदेंना २६.१ टक्के लोकांची पसंती…!, BJP च्या IT सेलच्या लवारीस कार्यकर्त्यांना छातीवर दगड ठेवून बघावे लागतंय
हेही वाचा…राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांपेक्षा शिंदेंना पसंती, शिवसेनेची जाहिरात भाजपला चिमटा?
हेही वाचा…‘या’ लोकसभा मतदारसंघावरून शिंदे अन् फडणवीसांचे ‘दोन’ भिडू भिडले, मोठा वाद चव्हाट्यावर
हेही वाचा…“औकातीत राहायचं तु गद्दार आहेस, जर तोंड उघडलं तर भारी पडेल”, राजन विचारे शिंदेंवर संतापले