पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केलं. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांना गद्दार म्हणून डिवचण्यास सुरूवात केली. यातच ठाकरे गटातील नेत्यांनी सातत्याने त्यांच्यावर गद्दार म्हणून शाब्दिक हल्लाबोल केला. यातच आता राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टोला हाणला आहे.
हेही वाचा…सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूने झुकला, पण ‘या’ कारणांमुळे शिंदेंची डोकेदुखी वाढली
सुप्रिया सुळे म्हणाल्या की,”गद्दार सरकारची वर्षुपुर्ती आता येते आहे. पण तुम्ही सगळे सांभाळून रहा. २० तारखेला कुणाला तिकीट दिलं गुवाहाटीच्या रॅडिसन हॉटलचं तर जाऊ नका. तुम्ही विचार करा गद्दारी करायला प्रायव्हेट प्लेन लागलं. फाईव्ह स्टार हॉटेल लागलं. अशी शाब्दिक टिप्पणी केली आहे.
हेही वाचा…वारीत फडणवीसांच्या नावाच्या टोप्या, “वारकऱ्यांच्या श्रद्धास्थानामध्ये प्रदूषित विचारसरणीची घुसखोरी बंद करा”, राष्ट्रवादीचा इशारा
दरम्यान,गद्दारी करताना कुणाला असं वाटलं नाही की आपण आपल्या मतदारसंघात जावं, गावातल्या लोकांना मिटींग घेऊन सांगावं की मी असा निर्णय घेतला आहे. तुम्ही माझ्यामागे उभे रहा. की नाही असं केलं? तुम्ही पक्ष बदलला, सरकार पाडलं, विचारधारा बदलली पण एकालाही वाटू नये? की आपल्या मतदारसंघात जावं.” असंही त्या म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांचा वैचारिक व्हायरस संपवणार,” गुणरत्ने सदावर्तेंची टिका, नथूराम गोडसेचाही कार्यक्रमात फोटो लावला
हेही वाचा…‘मिशन बारामती’, बारामती लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपची व्युहरचना
हेही वाचा…“..त्यामुळे औरंगजेब आपला होऊच शकत नाही”, हसन मुश्रीफांचा विरोधकांना टोला
हेही वाचा…एकनाथ शिंदेंची राज्याबाहेरच पहिल्यांदाच बैठक, केंद्र स्तरावर भाजपसोबत काम करण्यास शिंदेंची सुरूवात
हेही वाचा…कल्याणमध्ये खरचं भाजप श्रीकांत शिंदेंची ‘गेम’ करू शकते का? राजकीय गणित काय सांगते