मुंबई : निलंबित वकिल सदावर्ते गुणरत्ने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी एका कार्यक्रमात महापुरूषांच्या फोटो शेजारी नथूराम गोडसेचा फोटो लावल्याने त्यांच्यावर जोरदार टिका होत आहे. तर दुसऱ्या बाजूला गुणरत्ने सदावर्ते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जहरी टिका केली आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया देण्यात येतील ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…वारीत फडणवीसांच्या नावाच्या टोप्या, “वारकऱ्यांच्या श्रद्धास्थानामध्ये प्रदूषित विचारसरणीची घुसखोरी बंद करा”, राष्ट्रवादीचा इशारा
शरद पवारांना म्हणे धमकी देण्यात आली. पण त्यांना नेमकी धमकी कुणी दिली. शरद पवारांच्या काळातच दाऊद इब्राहिम उदयाला आला आहे. शरद पवारांचा जो वैचारिक व्हायरस आहे, तो व्हायरस आम्ही संपवणार आहोत. येणाऱ्या काही दिवसांत आम्ही महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा वैचारिक व्हायरस आणि त्यांच्या विचारांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी राज्यसभा सभा आणि बैठका घेणार आहोत. असंही सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…” त्यामुळेच राऊतांकडून नितेश राणेंवर अब्रुनुकसानीचा दावा, राणे-राऊत वाद हायकोर्टात पोहचला”
दरम्यान, सदावर्ते यांच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, आणि वीर सावरकर यांच्या शेजारी नथुराम गोडसेचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…‘मिशन बारामती’, बारामती लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपची व्युहरचना
हेही वाचा…“..त्यामुळे औरंगजेब आपला होऊच शकत नाही”, हसन मुश्रीफांचा विरोधकांना टोला
हेही वाचा…एकनाथ शिंदेंची राज्याबाहेरच पहिल्यांदाच बैठक, केंद्र स्तरावर भाजपसोबत काम करण्यास शिंदेंची सुरूवात
हेही वाचा…कल्याणमध्ये खरचं भाजप श्रीकांत शिंदेंची ‘गेम’ करू शकते का? राजकीय गणित काय सांगते
हेही वाचा…सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूने झुकला, पण ‘या’ कारणांमुळे शिंदेंची डोकेदुखी वाढली