ठाणे : धर्मवीर आनंद दिघे हे ठाण्याचे तर हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे देशाचे दैवत होते. यांचा तुम्ही अपमान केला आहे. आनंद दिघे यांचं आश्रम तुम्ही ऑफिस म्हणून केलं आहे. त्याठिकाणी सर्व जातीधर्माच्या लोकांची कामे केली जात होती. त्याठिकाणी तुमचं नाव लावून त्यांचा अपमान केला आहे. हिंमत असेल तर एक वास्तू घ्या. त्या वास्तूला नाव द्या. दिघेंनी आजपर्यंत लोकांची काम केली आहेत. परंतु त्यांचा तुम्ही अपमान केला आहे. त्यामुळे जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. असा घणाघात खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चढवला.
हेही वाचा…कल्याणमध्ये खरचं भाजप श्रीकांत शिंदेंची ‘गेम’ करू शकते का? राजकीय गणित काय सांगते
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान गेल्या ११ महिन्यापासून सातत्याने सुरू आहे. राज्यपाल असो किंवा चंद्रकांत पाटील असो, याठिकाणी कुणाचीही त्यांना बोलण्याची हिमंत होत नाही. कालचा दिव्यातील कार्यक्रमातही तुमचा निष्काळाजीपणा दिसून आला. दिव्यातील लोकांना पाणी बंद करून त्यांना तुम्ही भाषणासाठी बोलवलं. त्यांना तुम्ही किती वेठीस धरलं आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूने झुकला, पण ‘या’ कारणांमुळे शिंदेंची डोकेदुखी वाढली
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आदेश दिलेत, तर आम्ही निवडणुकीला तयार आहोत. त्यांनी कधीही निवडणुका घेऊन दाखवाव्यात. आम्हाला धमकी देऊ नका. आम्ही त्याच तालमीत वाढलो आहे. औकातीत राहायचं तु गद्दार आहेस. जर तोंड उघडलं तर भारी पडेल. असा इशाराही राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे. दिघें साहेबांच्या पिक्चरमध्ये म्हटलं आहे की गद्दारांना क्षमा नाही. त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…गद्दार सरकारची वर्षपुर्ती येतेय, तुम्ही जरा सांभाळून रहा एकनाथ शिंदे टोला
हेही वाचा…“शरद पवारांचा वैचारिक व्हायरस संपवणार,” गुणरत्ने सदावर्तेंची टिका, नथूराम गोडसेचाही कार्यक्रमात फोटो लावला
हेही वाचा…‘मिशन बारामती’, बारामती लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपची व्युहरचना
हेही वाचा…“..त्यामुळे औरंगजेब आपला होऊच शकत नाही”, हसन मुश्रीफांचा विरोधकांना टोला
हेही वाचा…एकनाथ शिंदेंची राज्याबाहेरच पहिल्यांदाच बैठक, केंद्र स्तरावर भाजपसोबत काम करण्यास शिंदेंची सुरूवात