मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळून राज्यामध्ये सत्तेत आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार लवकरच वर्षपूर्ती करणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आजवरची सर्वात मोठी उलथापालथ गेल्यावर्षी जून महिन्यात घडली होती. आपलेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देत शिंदे यांनी भाजपला साथ दिली होती. सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने मोठी जाहिरातबाजी करण्यात येत आहे. या माध्यमातून “राष्ट्रात मोदी अन् महाराष्ट्रात शिंदे” असा नारा देण्यात आला आहे.
हेही वाचा…“..त्यामुळे औरंगजेब आपला होऊच शकत नाही”, हसन मुश्रीफांचा विरोधकांना टोला
शिवसेनेकडून आज बहुतांश वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात देण्यात आली असून याध्यमातून सरकारच्या कामगिरीवर जनतेने शिक्कामोर्तब केल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट तुलना कधीही करण्यात आली नव्हती, मात्र जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना 26.1 टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के लोकांची पसंती असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे.
हेही वाचा…एकनाथ शिंदेंची राज्याबाहेरच पहिल्यांदाच बैठक, केंद्र स्तरावर भाजपसोबत काम करण्यास शिंदेंची सुरूवात
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात अव्वल स्थान मिळाल्याच जाहिरातीच्या माध्यमातून सांगण्यात आल आहे. शिवसेनेच्या जाहिरातबाजीने राजकारणात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असून विरोधकांपेक्षा ही जाहिरात भाजपला बोचनारी असल्याची टीका करण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…‘या’ लोकसभा मतदारसंघावरून शिंदे अन् फडणवीसांचे ‘दोन’ भिडू भिडले, मोठा वाद चव्हाट्यावर
हेही वाचा…“औकातीत राहायचं तु गद्दार आहेस, जर तोंड उघडलं तर भारी पडेल”, राजन विचारे शिंदेंवर संतापले
हेही वाचा…गद्दार सरकारची वर्षपुर्ती येतेय, तुम्ही जरा सांभाळून रहा एकनाथ शिंदे टोला
हेही वाचा…“शरद पवारांचा वैचारिक व्हायरस संपवणार,” गुणरत्ने सदावर्तेंची टिका, नथूराम गोडसेचाही कार्यक्रमात फोटो लावला
हेही वाचा…‘मिशन बारामती’, बारामती लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपची व्युहरचना