मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. महाविकास आघाडीतून शिवसेना एकनाथ शिंदे गट बाहेर पडला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती स्थापन करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीत कायम राहिला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. यातच आता एक एक्झिट पोलमुळे खळबळ उडाली आहे. झी न्युजच्या मॅटराईजने सर्व्हेतून माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“एक वकत नागोबाला मिठी मारा पण ह्या कमबाळाबाईला नगं.!”, राष्ट्रवादीचा सदाभाऊ खोत यांना टोला
आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने जाहिरातीतून एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचं स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीचा चेहरा म्हणून आता एकनाथ शिंदे यांना पाहिलं जात आहेत. मात्र एका एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार पुन्हा राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. झी न्यूने घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला १६५ ते १८५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा…फडणवीसांना २३. २ तर शिंदेंना २६.१ टक्के लोकांची पसंती…!, BJP च्या IT सेलच्या लवारीस कार्यकर्त्यांना छातीवर दगड ठेवून बघावे लागतंय
महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघापैकी भाजपला १२१ ते १३१ तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ४४ ते ५४ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला फक्त ०८ ते १८ जागा, तर राष्ट्रवादी काॅंग्रेसला ४१ ते ५१ आणि काॅंग्रेसला ३९ ते ४९ जागा मिळणार असल्याचं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं आहे. तर राज ठाकरे यांच्या मनसेला आगामी निवडणुकीत ०२ ते ०५ तर इतर अपक्षांना १२ ते २२ जागा मिळणार असल्याचं सर्व्हेतून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांपेक्षा शिंदेंना पसंती, शिवसेनेची जाहिरात भाजपला चिमटा?
दरम्यान, या सर्व्हेनुसार भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी फक्त २१ ते २५ जागांची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिंदेंची शिवसेनेची सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे कायमच राहतील की देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला छ.संभाजीनगरचे वावडे..! औरंगाबादचं नामांतराचा पडला विसर
हेही वाचा…मोदींना जिंकवण्यासाठी भाजप ‘ह्या’ खासदारांचे तिकीट कापणार, बड्या नेत्याचं वक्तव्य
हेही वाचा…शिंदे गटाची ‘ती’ जाहिरात भाजपला रूचली नाही, महायुतीत मिठाचा खडा
हेही वाचा…“अब्दुल सत्तार अन् घोटाळ्यांचे घनिष्ट नाते काही संपेना”, आणखी एक घोटाळा उघड
हेही वाचा…मनसेच्या फायर ब्रॅंड नेत्याचे ‘भावी खासदार’ म्हणून लागलेत बॅनर्स, लोकसभा पोटनिवडणुकीत मनसेची उडी