पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वप्फ मालमत्तांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या वेबपोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. मात्र याची माहिती देतांना त्यांनी छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख औरंगाबाद केल्याने राष्ट्रवादीने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. नामांतराचा विषय तुम्ही सुद्धा केवळ राजकारणासाठी वापरता का ? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
हेही वाचा…फडणवीसांना २३. २ तर शिंदेंना २६.१ टक्के लोकांची पसंती…!, BJP च्या IT सेलच्या लवारीस कार्यकर्त्यांना छातीवर दगड ठेवून बघावे लागतंय
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे कार्यालय औरंगाबादला असून राज्यातील वक्फ मालमत्तांशी संबंधित प्रकरणांच्या कामकाजाच्या अनुषंगाने औरंगाबाद येथे जावे लागते. ही अडचण दुर करून वक्फ मालत्तांशी संबंधित कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा निर्माण व्हावी, या हेतूने https://mahawaqf.maharashtra.gov.in हे वेब पोर्टल विकसित केले आहे. आता ऑनलाईन नोंदणीची सुविधा या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे. असं एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. त्यावरून रोहित पवारांनी निशाणा साधला आहे.
हेही वाचा…राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांपेक्षा शिंदेंना पसंती, शिवसेनेची जाहिरात भाजपला चिमटा?
दरम्यान, मुख्यमंत्री महोदय आजच्या जाहिरातीत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या फोटोचा जसा आपल्या पक्षाला विसर पडला. तसाच औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याचाही विसर पडलेला दिसतोय. आणि विसर पडला नसेल तर नामांतराचा विषय तुम्ही सुद्धा केवळ राजकारणासाठी वापरता, असं समजायचं का? विरोधी पक्षाकडून अशी चूक झाली असती तर सरकारकडून त्याचं राजकारण झालं असतं. मला राजकारण करायची नाही, पण आपल्या कार्यालयाकडून झालेली चूक निदर्शनास आणून द्यायचीय. ती आपण दुरूस्त कराल, ही अपेक्षा असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री महोदय आजच्या जाहिरातीत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या फोटोचा जसा आपल्या पक्षाला विसर पडला तसाच औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याचाही विसर पडलेला दिसतोय… आणि विसर पडला नसेल तर नामांतराचा विषय तुम्ही सुद्धा केवळ राजकारणासाठी वापरता, असं… https://t.co/Xbs6NAasS4 pic.twitter.com/xXJYI5Bl6L
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 13, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मोदींना जिंकवण्यासाठी भाजप ‘ह्या’ खासदारांचे तिकीट कापणार, बड्या नेत्याचं वक्तव्य
हेही वाचा…शिंदे गटाची ‘ती’ जाहिरात भाजपला रूचली नाही, महायुतीत मिठाचा खडा
हेही वाचा…“अब्दुल सत्तार अन् घोटाळ्यांचे घनिष्ट नाते काही संपेना”, आणखी एक घोटाळा उघड
हेही वाचा…मनसेच्या फायर ब्रॅंड नेत्याचे ‘भावी खासदार’ म्हणून लागलेत बॅनर्स, लोकसभा पोटनिवडणुकीत मनसेची उडी
हेही वाचा…“एक वकत नागोबाला मिठी मारा पण ह्या कमबाळाबाईला नगं.!”, राष्ट्रवादीचा सदाभाऊ खोत यांना टोला