जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एव्हाना देशातील राजकीय पक्षांनी तयारी सुरू करून दिली आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावाही घेतला जात आहे. तर देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तत्कालीन खासदारांना डावलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांपेक्षा शिंदेंना पसंती, शिवसेनेची जाहिरात भाजपला चिमटा?
मागच्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना भाजपकडून तिकीट देण्यात आले होते. रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. मात्र, आगामी निवडणुकीत त्यांना पुन्हा तिकीट मिळेल की नाही? याबाबत ठामपणे सांगता येणार नाही, असे वक्तव्य भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
हेही वाचा…‘या’ लोकसभा मतदारसंघावरून शिंदे अन् फडणवीसांचे ‘दोन’ भिडू भिडले, मोठा वाद चव्हाट्यावर
भाजपमध्ये संसदीय मंडळ आहे. तिथूनच सर्व नावं ठरतात. त्यामुळे ऐन वेळेवर काय होईल? हे सांगता येत नाही. मागच्या वेळेस तुम्ही पाहिले आहे, ऐन वेळेवर कसे तिकीट बदलतात. स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे कसं तिकीट बदललं? हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आज हे सांगणं कठीण होईल, हा निर्णय घेण्यासाठी पार्लमेंट बोर्ड हे सक्षम आहे आणि ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“औकातीत राहायचं तु गद्दार आहेस, जर तोंड उघडलं तर भारी पडेल”, राजन विचारे शिंदेंवर संतापले
जळगावातील जिल्ह्या पोलीस दलाच्या शासकीय वाहनांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे गटाची ‘ती’ जाहिरात भाजपला रूचली नाही, महायुतीत मिठाचा खडा
हेही वाचा…“अब्दुल सत्तार अन् घोटाळ्यांचे घनिष्ट नाते काही संपेना”, आणखी एक घोटाळा उघड
हेही वाचा…मनसेच्या फायर ब्रॅंड नेत्याचे ‘भावी खासदार’ म्हणून लागलेत बॅनर्स, लोकसभा पोटनिवडणुकीत मनसेची उडी
हेही वाचा…“एक वकत नागोबाला मिठी मारा पण ह्या कमबाळाबाईला नगं.!”, राष्ट्रवादीचा सदाभाऊ खोत यांना टोला
हेही वाचा…फडणवीसांना २३. २ तर शिंदेंना २६.१ टक्के लोकांची पसंती…!, BJP च्या IT सेलच्या लवारीस कार्यकर्त्यांना छातीवर दगड ठेवून बघावे लागतंय