अकोला : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार कायम वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. यातच आता एका खत कंपनीत कृषी विभागाच्या कथित पथकाने टाकलेल्या वादग्रस्त धाडीमुळे चर्चेत आले आहेत. या पथकात असलेला दीपक गवळी हा आपला स्वीय सहायक नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर २० दिवसानंतर त्यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय दौऱ्यात गवळीचा उल्लेख स्वीय सहायक असा केला. त्यावरून आता राष्ट्रवादीने अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“औकातीत राहायचं तु गद्दार आहेस, जर तोंड उघडलं तर भारी पडेल”, राजन विचारे शिंदेंवर संतापले
अब्दुल सत्तारांची ख्याती, सदैव चर्चेत राहती. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि घोटाळ्यांचे घनिष्ट नाते काही संपेना. कधी सरकारी अधिकाऱ्यांना दारूची ऑफर, कधी घोटाळ्यांचे आरोप, कधी महिलांचा अपमान अशा एक ना अनेक प्रकरणात मंत्री अब्दुल सत्तार अग्रस्थानी असतात. चुकीच्या कारणांमुळे चर्चेत राहण्याची कला त्यांना उत्तमरित्या अवगत आहे. असं म्हणत राष्ट्रवादीने अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…गद्दार सरकारची वर्षपुर्ती येतेय, तुम्ही जरा सांभाळून रहा एकनाथ शिंदे टोला
सत्तार यांच्या स्वीय सहाय्यकाकडून करण्यात आलेल्या घोटाळेबाज धाडीचे प्रकरण एबीपी माझाने उघड केले आहे. ई़डी सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री अब्दुल सत्तारांनी हे प्रकरण झाकण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र कोंबडं कितीही झाकलं तरी तांबडं फुटायचं राहत नाही, हे सत्तार विसरलेले दिसतात. आता ही धाड स्वीय सहाय्यकांनी कोणाच्या सांगण्यावरून केली असावी हा प्रश्न उपस्थितीत होतोय, त्याची स्पष्टता ईडी सरकारकडून मिळेल का? असा सवालही त्यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मनसेच्या फायर ब्रॅंड नेत्याचे ‘भावी खासदार’ म्हणून लागलेत बॅनर्स, लोकसभा पोटनिवडणुकीत मनसेची उडी
हेही वाचा…“एक वकत नागोबाला मिठी मारा पण ह्या कमबाळाबाईला नगं.!”, राष्ट्रवादीचा सदाभाऊ खोत यांना टोला
हेही वाचा…फडणवीसांना २३. २ तर शिंदेंना २६.१ टक्के लोकांची पसंती…!, BJP च्या IT सेलच्या लवारीस कार्यकर्त्यांना छातीवर दगड ठेवून बघावे लागतंय
हेही वाचा…राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांपेक्षा शिंदेंना पसंती, शिवसेनेची जाहिरात भाजपला चिमटा?
हेही वाचा…‘या’ लोकसभा मतदारसंघावरून शिंदे अन् फडणवीसांचे ‘दोन’ भिडू भिडले, मोठा वाद चव्हाट्यावर