मुंबई : राष्ट्रात मोदी तर महाराष्ट्रात शिंदे आशा आशायाची जाहिरात आज शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून लावण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला डिवचण्याचा प्रयत्न शिंदेंकडून करण्यात आला आहे. यावरून आता राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपला डिवचण्यात आलं आहे.
हेही वाचा…मनसेच्या फायर ब्रॅंड नेत्याचे ‘भावी खासदार’ म्हणून लागलेत बॅनर्स, लोकसभा पोटनिवडणुकीत मनसेची उडी
एकनाथ शिंदे यांची जाहिरात देणारी शिवसेना इतक्या लवकर बाळासाहेबांना कशी विसरली ? असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. शिंदेंनी बाळासाहेब आणि आनंद दिघेंच्या विचारांमुळे शिवसेना ताब्यात घेतल्याचं सांगताहेत. परंतु त्या जाहिरातीमध्ये कुणाचाच फोटो दिसत नाही. अशा प्रकराच्या जाहिराती पाहिल्या, परंतु स्वत: च ठरवून सर्व्हे केल्याचा विश्वविक्रमच राज्याच्या प्रमुखांनी एक प्रकारे केला आहे. असं म्हणत यांचं काम एवढं चांगलं आहे तर जाहिराती देण्याची काय गरज ? असा सवालही अजित पवारांनी केला.
हेही वाचा…“एक वकत नागोबाला मिठी मारा पण ह्या कमबाळाबाईला नगं.!”, राष्ट्रवादीचा सदाभाऊ खोत यांना टोला
एकनाथ शिंदे यांना जनतेने पुन्हा चांद्यापासून बांद्यापर्यंत मुख्यमंत्रीपदाचा कौल दिल्याचा मला आनंद वाटत आहे. इतक्या लोकांचा तुम्हाला पाठिंबा असेल तर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका का घेत नाही? त्यांना निवडणुका घेण्याची भिती वाटत आहे. पण जाहिरातीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करायचा. शिवसेना आमचीच असा दावा करणाऱ्यांनी मोदींचा फोटा टाकला परंतु बाळासाहेबांचा फोटो त्यांनी वगळला आहे. हा बाळासाहेबांचा अपमान नाही का ? असा सवालही अजित पवार यांनी केला आहे.
हेही वाचा…फडणवीसांना २३. २ तर शिंदेंना २६.१ टक्के लोकांची पसंती…!, BJP च्या IT सेलच्या लवारीस कार्यकर्त्यांना छातीवर दगड ठेवून बघावे लागतंय
शिवसेनेकडून आज बहुतांश वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात देण्यात आली असून याध्यमातून सरकारच्या कामगिरीवर जनतेने शिक्कामोर्तब केल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट तुलना कधीही करण्यात आली नव्हती, मात्र जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना 26.1 टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के लोकांची पसंती असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राज्यात आज निवडणुका झाल्यास काय होणार ? सर्वात मोठा एक्झिट पोल आला पुढे, शिंदेंचं काय होणार?
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला छ.संभाजीनगरचे वावडे..! औरंगाबादचं नामांतराचा पडला विसर
हेही वाचा…मोदींना जिंकवण्यासाठी भाजप ‘ह्या’ खासदारांचे तिकीट कापणार, बड्या नेत्याचं वक्तव्य
हेही वाचा…शिंदे गटाची ‘ती’ जाहिरात भाजपला रूचली नाही, महायुतीत मिठाचा खडा
हेही वाचा…“अब्दुल सत्तार अन् घोटाळ्यांचे घनिष्ट नाते काही संपेना”, आणखी एक घोटाळा उघड