मुंबई : आगामी काही काळात निवडणुकांचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे आता राज्यात एव्हाना देशात राजकीय पक्षांत भाकरी फिरवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचा आढावा बैठका सुरू केल्या आहेत. यातच महाराष्ट्राचे काॅंग्रेसचे प्रभारी एच के. पाटील यांनी राज्यातील काॅंग्रेसच्या नेत्यांची बैठक घेतली यात मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला.
हेही वाचा…“शिवसेना आमचीच दावा करणाऱ्यांनी बाळासाहेबांचा फोटो वगळला, हा त्यांचा अपमान नाही का ?” अजित पवारांचा सवाल
अलिकडेच काॅंग्रेसच्या नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन निवडणुक रणनीतीवरही चर्चा करण्यात आल्याची माहिती राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यातच महाराष्ट्र काॅंग्रेसनं एक अहवाल पक्षश्रेष्ठींना दिला आहे. ज्यात ४८ पैकी २१ लोकसभा मतदारसंघ काॅंग्रेससाठी सकारात्मक असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हेही वाचा…राज्यात आज निवडणुका झाल्यास काय होणार ? सर्वात मोठा एक्झिट पोल आला पुढे, शिंदेंचं काय होणार?
यातच ४० लोकसभा आणि २०० पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात पक्षाची परिस्थिती खुप चांगली आहे. येणाऱ्या काळात लोकसभा-विधानसभा निवडणुकीत जोमानं कसं जायचं आहे ? याची तयारी सुरू आहे. असं काॅंग्रेसचे नेते नसीम खान म्हणाले. तर विदर्भातील नागपुर, चंद्रपुर, गडचिरोली, रामटेक, अकोला, वर्धा, यवतमाळ, अमरावती, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, शिर्डी, मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापुर, कोल्हापुर, हातकणंगले, सांगली आणि मुंबईतील दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम हे २१ मतदारसंघ काॅंग्रेससाठी सकारात्मक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…केंद्रात ‘मोदी’ भाकरी फिरवणार, महाराष्ट्रात ‘या’ राज्यसभेच्या खासदारांना औटघटका ?
हेही वाचा…“इजा कानाला झालेली नव्हती तर मनाला झाली होती, त्यामुळेच आज पुन्हा नवीन जाहिरात”
हेही वाचा…शिरूर लोकसभेसाठी महेश लांडगे लागले कामाला..! ओझरमध्ये “श्री गणेशा”, सोबतीला भाजपची फौज
हेही वाचा…“महाराष्ट्रातच नाही तर या राज्यांतही मित्रपक्षांचं भाजपसोबत बिनसलं” मोदींना मोठा धक्का बसण्याची शक्यता
हेही वाचा…“कमी मार्काने पास झालो हे जाहिरातबाजीतून सांगणारा शिंदेंचा पहिलाच पक्ष”,सुप्रिया सुळेंनी उडवली शिंदेंची खिल्ली