पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. यामध्ये केंद्र आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपने आघाडी घेतल्याचं दिसत आहे. गेल्या आठवड्यात भाजपकडून लोकसभा प्रमुखांची निवड करण्यात आली होती. मतदारसंघामध्ये रणनीती आखण्याचे काम प्रमुखांकडून केलं जाणार आहे. शिरूरसाठी आमदार महेश लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली असून आज त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटीला सुरुवात करत ओझरमध्ये श्री गणेशा केला आहे.
हेही वाचा…मोदींना जिंकवण्यासाठी भाजप ‘ह्या’ खासदारांचे तिकीट कापणार, बड्या नेत्याचं वक्तव्य
आमदार महेश लांडगे यांच्या नावांची शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आठवडाभरपूर्वी जाहीर केलं होत. मतदारसंघात असणारे लांडगे यांच्या नावाचे वलय आणि संघटनात्मक बांधणीची जोड पाहता त्यांची निवड करण्यात आली. भोसरी मतदारसंघावर पकड असतानाच लांडगे यांनी बैलगाडा शर्यतीसाठी उभारण्यात आलेल्या लढ्याच्या माध्यमातून शिरूर लोकसभेत मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे. याच अनुभवाचा वापर आता शिरूरमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी करावा लागणार आहे.
हेही वाचा…शिंदे गटाची ‘ती’ जाहिरात भाजपला रूचली नाही, महायुतीत मिठाचा खडा
शिरुर लोकसभा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर आज ओझर येथील विघ्नहर गणेश मंदिरात मंदिरात दर्शन घेत लांडगे यांच्याकडून कामाचा श्री गणेशा करण्यात आला. यावेळी जुन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख आशा बुचके, भोसरी विधानसभा निवडणूक प्रमुख विकास डोळस, हडपसर विधानसभा निवडणूक प्रमुख योगेश टिळेकर, खेड विधानसभा निवडणूक प्रमुख अतुल देशमुख, शिरुर-हवेली विधानसभा निवडणूक प्रमुख प्रदीप कंद आणि लोकसभा समन्वयक डॉ. धर्मेंद्र खंडारे आदी उपस्थित होते.
हेही वाचा…“अब्दुल सत्तार अन् घोटाळ्यांचे घनिष्ट नाते काही संपेना”, आणखी एक घोटाळा उघड
विघ्नहर्ता गणरायाच्या आशिर्वादाने मोदी सरकारने गेल्या ९ वर्षांत केलेली विकासकामे आणि कल्याणकारी निर्णय तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी लांडगे यांच्यावतीने करण्यात आला.
READ ALSO :
हेही वाचा…“महाराष्ट्रातच नाही तर या राज्यांतही मित्रपक्षांचं भाजपसोबत बिनसलं” मोदींना मोठा धक्का बसण्याची शक्यता
हेही वाचा…“कमी मार्काने पास झालो हे जाहिरातबाजीतून सांगणारा शिंदेंचा पहिलाच पक्ष”,सुप्रिया सुळेंनी उडवली शिंदेंची खिल्ली
हेही वाचा…“शिवसेना आमचीच दावा करणाऱ्यांनी बाळासाहेबांचा फोटो वगळला, हा त्यांचा अपमान नाही का ?” अजित पवारांचा सवाल
हेही वाचा…राज्यात आज निवडणुका झाल्यास काय होणार ? सर्वात मोठा एक्झिट पोल आला पुढे, शिंदेंचं काय होणार?
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला छ.संभाजीनगरचे वावडे..! औरंगाबादचं नामांतराचा पडला विसर