मुंबई : “राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे”, अशा आशायाची जाहिरात काल शिंदे गटाने सर्व वर्तमानपत्रात दिली होती. या जाहिरातीमध्ये बाळासाहेबांचा फोटो टाकण्यात आलेला नव्हता तर शिंदेंना फडणवीसांपेक्षा वरचढ असल्याचं दाखवण्यात आलं. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी शिंदेंवर टिका केली. यातच भाजपच्याही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. यातच आता शिंदे गटाने आज पुन्हा वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे. त्यावरून आता भाजपच्या खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्रातच नाही तर या राज्यांतही मित्रपक्षांचं भाजपसोबत बिनसलं” मोदींना मोठा धक्का बसण्याची शक्यता
एकनाथ शिंदे यांनी सर्वे फक्त ठाण्यापुरता केला होता का ? बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होणार आहे का ? असा सवाल भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांचे सल्लागार चांगले ठेवावे. एकनाथ शिंदेंना ठाणे म्हणजे पुर्ण महाराष्ट्र वाटलं का? आज राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस सर्वांसाठी काम करीत आहेत. यातच पुढच्या काळात शिवसेनेला भाजपसोबत काम करायचे असेल तर त्यांच्या कानात टिमकी वाजवणारे काही सल्लागार दुर केले पाहिजेत. असं म्हणत अनिल बोंडे यांनी शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“कमी मार्काने पास झालो हे जाहिरातबाजीतून सांगणारा शिंदेंचा पहिलाच पक्ष”,सुप्रिया सुळेंनी उडवली शिंदेंची खिल्ली
दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना अगोदरच आमची कालच्या जाहिरातीवर भूमिका मांडली आहे. ती जाहिरातीचा आमचा काहीही संबंध नाही. आजची जाहिरातीमधून आमची भूमिका मांडली आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांंची आम्ही प्रत्यक्ष भेट घेणार आहोत. त्यामुळे त्यावरील विषय आता दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी संपावयला हवा. असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“शिवसेना आमचीच दावा करणाऱ्यांनी बाळासाहेबांचा फोटो वगळला, हा त्यांचा अपमान नाही का ?” अजित पवारांचा सवाल
तर, एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना महत्वाच्या नेत्यांकडून नाही पण खालचे जे काही निवडक लोक आहेत. त्यांच्याकडून जो त्रास होतो, तो थांबला पाहिजे. त्यांची कदर केली पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्या बलिदानातून तुमचं सरकार आलं आहे. तुम्ही तिथं सत्तेत बसले नाही तर पाच वर्ष अजून ठाकरे साहेबांचं सरकार राहिलं असतं. आज जे शंभर आमदार आहेत. उद्या भाजपचे ५० ,६० वर आले असते. असं अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी मनसैनिकांनी हनुमानाला घातला नवस,” राष्ट्रवादीची टिका
हेही वाचा…“४८ मतदारसंघापैकी हे २१ लोकसभा मतदारसंघ काॅंग्रेससाठी पोषक”, काॅंग्रेसचा निवडणुकीसाठी रोडमॅप ठरला
हेही वाचा…केंद्रात ‘मोदी’ भाकरी फिरवणार, महाराष्ट्रात ‘या’ राज्यसभेच्या खासदारांना औटघटका ?
हेही वाचा…“इजा कानाला झालेली नव्हती तर मनाला झाली होती, त्यामुळेच आज पुन्हा नवीन जाहिरात”
हेही वाचा…शिरूर लोकसभेसाठी महेश लांडगे लागले कामाला..! ओझरमध्ये “श्री गणेशा”, सोबतीला भाजपची फौज