मुंबई : “राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे”, अशा आशायाची जाहिरात काल शिंदे गटाने सर्व वर्तमानपत्रात दिली होती. या जाहिरातीमध्ये बाळासाहेबांचा फोटो टाकण्यात आलेला नव्हता तर शिंदेंना फडणवीसांपेक्षा वरचढ असल्याचं दाखवण्यात आलं. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी शिंदेंवर टिका केली. यातच भाजपच्याही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. यातच आता शिंदे गटाने आज पुन्हा वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…केंद्रात ‘मोदी’ भाकरी फिरवणार, महाराष्ट्रात ‘या’ राज्यसभेच्या खासदारांना औटघटका ?
शिवसेनेने दिलेल्या कालच्या जाहिरातीमधून भाजपच्या काही कार्यकर्त्यांचं मन तुटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. तसेच ते भाजपचे सर्वोत्कृष्ट नेते असून त्यांच्याकडे ती क्षमता आहे. या आधारावर त्यांनी महाराष्ट्राच्या लाखो कार्यकर्त्यांना घडवलं आहे. त्यामुळे थोडी ठेच काही पदाधिकाऱ्यांना लागली आहेत. तसेच देवेंद्र फडणवीसांचा तुलना एकनाथ शिंदे यांच्याशी करणं थोडसं त्याठिकाणी अचंबित करणारं आहे. असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“इजा कानाला झालेली नव्हती तर मनाला झाली होती, त्यामुळेच आज पुन्हा नवीन जाहिरात”
दरम्यान, आता हा विषय संपलेला आहे. पण पुढच्या काळात असे विषय होऊ नये म्हमून याकरता काळजी घेण्याची गरज आहे. याबाबतीत एकनाथ शिंदेंची माझं बोलणं झालं आहे. भाजप हा सर्वोत मोठा पक्ष आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस लहान मोठ्या भावासारखे काम करताहेत. मग अशा परिस्थितीत कोण मध्ये ठिणगी पाडत आहेत ? असा सवालही बावनकुळे यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“नुसत्या नकला करून मुख्यमंत्री होता येत नाही”, आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला
हेही वाचा…“शिवसेना-भाजप वाद मिटवण्यासाठी शिंदे समिती नेमणार”, शिवसेनेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेपर्यंत शांत बसणार
हेही वाचा…महायुतीत ठिणगी…! एकनाथ शिंदेंना ठाणे म्हणजे संपुर्ण महाराष्ट्र वाटलं का ? भाजपच्या खासदाराचा सवाल
हेही वाचा…“राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी मनसैनिकांनी हनुमानाला घातला नवस,” राष्ट्रवादीची टिका
हेही वाचा…“४८ मतदारसंघापैकी हे २१ लोकसभा मतदारसंघ काॅंग्रेससाठी पोषक”, काॅंग्रेसचा निवडणुकीसाठी रोडमॅप ठरला