मुंबई : “राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे”, अशा आशायाची जाहिरात काल शिंदे गटाने सर्व वर्तमानपत्रात दिली होती. या जाहिरातीमध्ये बाळासाहेबांचा फोटो टाकण्यात आलेला नव्हता तर शिंदेंना फडणवीसांपेक्षा वरचढ असल्याचं दाखवण्यात आलं. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी शिंदेंवर टिका केली. यातच भाजपच्याही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. यातच आता शिंदे गटाने आज पुन्हा वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे. त्यावरून आता भाजपच्या खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर आता शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…महायुतीत ठिणगी…! एकनाथ शिंदेंना ठाणे म्हणजे संपुर्ण महाराष्ट्र वाटलं का ? भाजपच्या खासदाराचा सवाल
मुख्यमंत्र्यांची वाहवा जर जनता करत असेल तर ते कटू सत्य पचविण्याची ताकत राजकीय नेत्यांनी ठेवावी. सुरूवातीला भाजपचे दोनच खासदार होते, आज त्यांचे ३०० च्यावर खासदार झाले आहेत. आमच्या नेत्याबद्दल अशी भाषा करत असतील तर वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालावं. असं आवाहन संजय गायकडवा यांनी दिलं आहे. शिवसेनेच्या मतदारसंघात हस्तक्षेप करणे थांबवा. तुम्ही कोणाच्या संगतीने मोठे झालात याचाही विचार करा. बाळासाहेब ठाकरेंचे बोट पकडून आपण मोठे झाला आहात. नाहीतर आपली काय औकात होते हे लक्षात ठेवले पाहिजे. असा टोलाही संजय गायकवाडांनी लगावला आहे.
हेही वाचा…“राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी मनसैनिकांनी हनुमानाला घातला नवस,” राष्ट्रवादीची टिका
एकनाथ शिंदे यांनी सर्वे फक्त ठाण्यापुरता केला होता का ? बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होणार आहे का ? असा सवाल भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांचे सल्लागार चांगले ठेवावे. एकनाथ शिंदेंना ठाणे म्हणजे पुर्ण महाराष्ट्र वाटलं का? आज राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस सर्वांसाठी काम करीत आहेत. यातच पुढच्या काळात शिवसेनेला भाजपसोबत काम करायचे असेल तर त्यांच्या कानात टिमकी वाजवणारे काही सल्लागार दुर केले पाहिजेत. असं म्हणत अनिल बोंडे यांनी शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीपाठोपाठ आता भाजपलाही BRS ने सुरूंग, माजी जिल्ह्याध्यक्षाचा बीआरएसमध्ये प्रवेश
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंबाबत बेडकाची भाषा शिंदे गटाने कदापी खपवून घेऊ नये”
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंसोबत फडणवीसांची तुलना , हे थोडं अचंबित करणारं”, बावनकुळे
हेही वाचा…“नुसत्या नकला करून मुख्यमंत्री होता येत नाही”, आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला
हेही वाचा…“शिवसेना-भाजप वाद मिटवण्यासाठी शिंदे समिती नेमणार”, शिवसेनेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेपर्यंत शांत बसणार