मुंबई : मागील काही दिवसापासुन शिंदे-फडणवीसांच्या महायुतीत आलबेल दिसत नाही. शिवसेनेच्या शिंदे गटाने दिलेल्या जाहिरातीवरून भाजप आणि शिंदे गटात मोठी धुसपुस बघायला मिळत आहे. यातच आता उल्हासनगरमध्ये भाजपकडून शिंदे गटाला बॅनरबाजी लावून डिवचण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
हेही वाचा…“राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी मनसैनिकांनी हनुमानाला घातला नवस,” राष्ट्रवादीची टिका
उल्हासनगरात पुन्हा एकदा शिवसेना, भाजपमध्ये बॅनरवॉर पाहायला मिळत आहे. भाजपने बॅनर लावत शिवसेना शिंदे गटाला थेट डिवटलं आहे. ५० कुठं आणि १०५ कुठं? हा आमच्या भाजपचा मोठेपणा..! देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है.. असा मजकुर असलेले बॅनर्स उल्हासनगरात लावण्यात आळे आहेत.या बॅनर्सवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. त्याखाली किंगमेकर असं लिहिलं आहे. याच बॅनर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा आणि अमित शाह यांच्यासह पंकजा मुंडे तसेच रवींद्र चव्हाण यांचेही फोटो आहेत.
हेही वाचा…“४८ मतदारसंघापैकी हे २१ लोकसभा मतदारसंघ काॅंग्रेससाठी पोषक”, काॅंग्रेसचा निवडणुकीसाठी रोडमॅप ठरला
दरम्यान, उल्हासनगरमध्ये काल ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरूण आशान यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनर लावत भाजपच्या नेत्यांना डिवचलं होतं. कमजोर लोग ही शिका और शिकायत करते है, महान लोग तो हमेशा कर्म की वकालत करते है. माझा नेता माझा अभिमान अशा आशायाचे बॅनर उल्हासनगर कॅम्प ४ मध्ये लावण्यात आले होते.
READ ALSO :
हेही वाचा…आधी थेट फडणवीसांना आव्हान! आता पुन्हा करणार भाजपमध्ये प्रवेश, आशिष देशमुखांनी काढला मुहूर्त
हेही वाचा…नवनीत राणांच्या विरोधात राष्ट्रवादी ‘हा’ तगडा उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंचाही बदला घेणार ?
हेही वाचा…जाहिरात देणारा हितचिंतक कोण, जाहिरातीचे पैसे कुणी दिले? अजित पवारांचा सवाल
हेही वाचा…राज्यात फडणवीसांच्या सभांचा सिलसिला सुरू होणार, भाजपने मोठी रणनीती आखली
हेही वाचा…महायुतीत ठिणगी…! एकनाथ शिंदेंना ठाणे म्हणजे संपुर्ण महाराष्ट्र वाटलं का ? भाजपच्या खासदाराचा सवाल