अमरावती : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीत गडचिरोली-चिमूर, अमरावती, वर्धा, रामटेक लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. ही बैठक स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा…केंद्रात ‘मोदी’ भाकरी फिरवणार, महाराष्ट्रात ‘या’ राज्यसभेच्या खासदारांना औटघटका ?
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात आता या जागेवरून काॅंग्रेससह, राष्ट्रवादीने ही दावा सांगितला आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू देखील निवडणुक लढविण्यास इच्छुक आहेत. यातच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी देखील ही जागा लढविण्याची तयारी दर्शवली आहे. यातच आता ही जागा राष्ट्रवादीचीच असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“इजा कानाला झालेली नव्हती तर मनाला झाली होती, त्यामुळेच आज पुन्हा नवीन जाहिरात”
अमरावती लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असून मागच्या वेळी काही कारणास्तव पक्षाकडून अपक्ष उमेदवाराला पक्ष पुरस्कृत करण्यात आले होते. या भागातील कार्यकर्ते ही जागा लढवण्यासाठी आग्रही आहेत. जागा वाटपावर अजून चर्चा होणे बाकी आहे. या बैठकांमधून केवळ कार्यकर्त्यांशी चर्चा करून जागांचा आढावा घेण्याचे काम होत असल्याचे जयंतराव पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा…शिरूर लोकसभेसाठी महेश लांडगे लागले कामाला..! ओझरमध्ये “श्री गणेशा”, सोबतीला भाजपची फौज
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार असतांना नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात रान पेटवून दिलं होतं. हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून नवनीत राणांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं होतं. त्याच्याच आता महाविकास आघाडीकडून अमरावतीची जागा राष्ट्रवादीने घेतल्यास ठाकरेंचा बदला घेऊ, असा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जाहिरात देणारा हितचिंतक कोण, जाहिरातीचे पैसे कुणी दिले? अजित पवारांचा सवाल
हेही वाचा…राज्यात फडणवीसांच्या सभांचा सिलसिला सुरू होणार, भाजपने मोठी रणनीती आखली
हेही वाचा…महायुतीत ठिणगी…! एकनाथ शिंदेंना ठाणे म्हणजे संपुर्ण महाराष्ट्र वाटलं का ? भाजपच्या खासदाराचा सवाल
हेही वाचा…“राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी मनसैनिकांनी हनुमानाला घातला नवस,” राष्ट्रवादीची टिका
हेही वाचा…“४८ मतदारसंघापैकी हे २१ लोकसभा मतदारसंघ काॅंग्रेससाठी पोषक”, काॅंग्रेसचा निवडणुकीसाठी रोडमॅप ठरला