ठाणे : ठाणे जिल्ह्याील मानपाडा येथील वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे याने बेहिशेबी मालमत्ता जमवली आहे. त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. बागडे यांची मालमत्तेची यादी आणि आकडेवारीच अजित पवारांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…राज्यात फडणवीसांच्या सभांचा सिलसिला सुरू होणार, भाजपने मोठी रणनीती आखली
अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली आहे. नाशिकमध्ये जमिनी, व्यावसायिक गाळे, फ्लॅट्स तसेच नवी मुंबईत देखील मोक्याच्या जागी त्याच्या सदनिका आहेत. त्याने एवढी सगळी मालमत्ता कशी जमवली? असा सवाल अजित पवारांनी केला. शेखर बागडे याची देवळाली कॅम्प येथे ३ मजली व्यावसायिक मालमत्ता, निवासी फ्लॅट सुमंगल रेसिडेन्सी, तिरूमल्ला हाईट्स. येथे दुकान आणि व्यावसायिक गाळे आहेत. तसेच रिद्धी सिद्धी कन्स्ट्रक्शन मध्येही त्याची गुंतवणुक, अमृत सोसायटी सानपाडा नवी मुंबईत देखील त्याचा फ्लॅट्स, पांडुर्ली भगूर इथे त्याची शेतजमीन, इगतपुरी येथे शेतजमीन .एका साध्या पोलीस ऑफिसरकडे एवढी मालमत्ता कशी असू शकते? एवढी मालमत्ता त्याने मिळवली कशी आणि कुठून.? अनेकांनी त्याच्याबद्दल चौकशी करावी अशी मागणी केली असल्याचे अजित पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…महायुतीत ठिणगी…! एकनाथ शिंदेंना ठाणे म्हणजे संपुर्ण महाराष्ट्र वाटलं का ? भाजपच्या खासदाराचा सवाल
दरम्यान, शेखर बागडे यांच्याविषयी राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील आरोप केले आहेत. ते म्हणाले की, शिवसेना, भाजपामध्ये ज्या गोष्टीवरुन ठाण्यामध्ये वाद सुरु आहे; तो मानपाडा येथील पोलीस निरीक्षक शेखर बागडे याच्यामुळे प्रचंड पैशाचा उन्माद, “मी त्यांना फाट्यावर मारतो” हे त्याचे आवडते विधान. पैशाच्या मग्रुरीमुळे आपण कोणालाही विकत घेऊ शकतो हे त्याच्या डोक्यामध्ये फिट बसले आहे. आज अजित पवार यांनी त्याची प्रॉपर्टी वाचून दाखवली ही प्रॉपर्टी त्याच्या असलेल्या प्रॉपर्टीच्या 20 टक्के पण, नाही. अजून तर त्याची खूप प्रॉपर्टी इकडे-तिकडे पसरलेली आहे. खालापूर येथे एक फूड कोर्ट पेट्रोल पंप जे MSRDC ने ज्याच्या नावावर दिले होते. त्याच्याकडून जबरदस्तीने पार्टनरशीप घेऊन त्याला चेक देऊन आणि नंतर त्या चेकचा व्यवहार पूर्ण न करता ते फुड कोर्ट पेट्रोल पंप आणि त्याच्या आजूबाजूची सगळी जागा शेखर बागडे ने बळकावली आहे.
हेही वाचा…“राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी मनसैनिकांनी हनुमानाला घातला नवस,” राष्ट्रवादीची टिका
प्रचंड दादागिरी करुन मूळ मालकास तेथे येण्यासही मज्जाव केला आहे. तो मूळ मालक तेथे गेल्यास स्थानिक पोलीसच त्या मूळ मालकाला अटक करतात. कारण बागडे साहेबांचा एरीया आहे. तिथे बाऊन्सर बसवले आहेत. तिथे गुंडांची ये-जा सुरु असते. आणि दिवसाला जवळ-जवळ 20 ते 25 लाख रुपयांची कमाई तिथे होते. पेट्रोल पंपाचा चेक आणि सीसीडे चा चेक हा अधिकृत असल्याने मूळ मालकाच्या खात्यावर जातो. उर्वरीत संपूर्ण रोख पैसे बागडे आपल्या घरी घेऊन जातो. ह्या सगळ्या प्रॉपर्टीवर लोन आहे. त्या लोनचा EMI मात्र त्या गरीबाला भरावा लागतो. पोलीसांकडे अनेक तक्रार येतात. पोलीस त्याची दखल देखिल घेतात, शेवटपर्यंत जातात देखिल; परंतु त्यांना वरुन फोन येतो. आता वरुन फोन कोणाचा येतो हे श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना वेगळ सांगायला नको. अशा या शेखर बागडे बद्दल अजित पवार यांनी त्याच्या अनधिकृत संपत्ती बद्दल विषय काढला. त्यामुळे मी ही अधिकची माहिती महाराष्ट्राला देत असल्याचं आव्हाडांनी म्हटलं आहे.
शिवसेना, भाजपामध्ये ज्या गोष्टीवरुन ठाण्यामध्ये वाद सुरु आहे; तो मानपाडा येथील पोलीस निरीक्षक शेखर बागडे याच्यामुळे प्रचंड पैशाचा उन्माद, “मी त्यांना फाट्यावर मारतो” हे त्याचे आवडते विधान. पैशाच्या मग्रुरीमुळे आपण कोणालाही विकत घेऊ शकतो हे त्याच्या डोक्यामध्ये फिट बसले आहे. आज… pic.twitter.com/4PQyTsfUxf
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 14, 2023
READ ALSO :
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का..! संजय राऊतांच्या निकवर्तीयांनी केला शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…“५० कुठं अन् १०५ कुठं? देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है.!” भाजपने शिंदेंना डिवचलं, महायुतीत मिठाचा खडा
हेही वाचा…आधी थेट फडणवीसांना आव्हान! आता पुन्हा करणार भाजपमध्ये प्रवेश, आशिष देशमुखांनी काढला मुहूर्त
हेही वाचा…नवनीत राणांच्या विरोधात राष्ट्रवादी ‘हा’ तगडा उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंचाही बदला घेणार ?
हेही वाचा…जाहिरात देणारा हितचिंतक कोण, जाहिरातीचे पैसे कुणी दिले? अजित पवारांचा सवाल