मुंबई : शिवसेनेच्या जाहिरातीवरून शिंदे-फडणवीस यांच्या महायुतीतील नेत्यांमध्ये घमासाम सुरू झालं आहे. खासदार अनिल बोंडे यांनी एकनाथ शिंदे यांना थेट बेडकाची उपमा दिली आहे. त्यावरून आता शिंदे गटातील नेते जोरदार टिकास्त्र सोडतांना दिसत आहेत. यातच आता अपक्ष आमदार आणि शिंदेसोबत युतीत असलेले बच्चू कडू यांनी अनिल बोंडे यांची लायकी काढली आहे.
हेही वाचा…नवनीत राणांच्या विरोधात राष्ट्रवादी ‘हा’ तगडा उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंचाही बदला घेणार ?
खासदार अनिल बोंडे यांनी आपली लायकी पाहून बोललं पाहिजे. आपण कोणामुळे कुठे आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. थोडी अक्कल नसल्यासारखं त्यांनी बोलू नये. असं म्हणत केंद्रांत कुठेतरी अडचणी येत असेल आणि म्हणून इकडे काही तरी बोलावं, अशातला हा प्रकार सुरू असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. भाजप अशा पद्धतीने कोणाला धीरे धीरे सोबत करून कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…जाहिरात देणारा हितचिंतक कोण, जाहिरातीचे पैसे कुणी दिले? अजित पवारांचा सवाल
दरम्यान, दोन्ही नेते एकाच वेळी सरकारमध्ये आहेत. जर लोकांना माहिती झालं तर लोक फार विचार करून समोर जातील. त्या पद्धतीने जर कोणी असा आपल्याच माणसाला असं बोलायंच आणि त्यांच्या लोकप्रियतेला अशा पद्धतीने कमी करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे. शिंदे साहेबांची तुलना कुणासोबत होऊच शकत नाहीत असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सगळ्यांची कुंडली माझ्याकडे आहे, तुम्ही पक्षासाठी चांगलं काम करा”, एकनाथ शिंदेंचा थेट इशारा
हेही वाचा…एक साध्या पोलीस ऑफिसरकडे इतकी मालमत्ता कशी? अजित पवारांनी थेट यादीच वाचून दाखवली
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का..! संजय राऊतांच्या निकवर्तीयांनी केला शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…“५० कुठं अन् १०५ कुठं? देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है.!” भाजपने शिंदेंना डिवचलं, महायुतीत मिठाचा खडा
हेही वाचा…आधी थेट फडणवीसांना आव्हान! आता पुन्हा करणार भाजपमध्ये प्रवेश, आशिष देशमुखांनी काढला मुहूर्त