मुंबई : मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आग लागली. जीव वाचवताना एका रहिवाशाचा खाली पडून मृत्यू झाला. त्यानंतर, इमारतीचे जे कोणी मॅनेजमेंट आहेत, ते आग प्रकरणी प्रथमदर्शनी दोषी दिसत आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.
आम्हाला देवळाची घंटा वाजविण्याची सवय, आज नाट्यगृहातील घंटा पहिल्यांदा वाजवली – अजित पवार
अग्निशमन दलाचे जवान शिडी लावून चढेपर्यंत अरुण तिवारी याचा हात निसटला आणि तो खाली पडला. बहुतेक 19 व्या मजल्यावर फर्निचरचं काम सुरु होतं. तिथे ठिणगी उडून आग लागल्याची माहिती आहे. सोसायटीतील रहिवासी सांगतात की त्यांची वॉटर सिस्टम चालू नव्हती. दरवेळी महापालिका काय करेल, सगळ्या सिस्टम आहेत. पण सिस्टम वर्किंगमध्ये ठेवली नाही. इमारतीचे जे कोणी मॅनेजमेंट आहेत, ते प्रथमदर्शनी दोषी दिसत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
जत्रेत खेळणाऱ्यांनी तालमीत खेळणाऱ्या पैलवानाचा नाद करू नये; अजित पवारांच्या बॅनरची चर्चा
इमारतीला आग लागल्यानंतर इमारतीतील रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी 30 वर्षीय अरुण तिवारी इमारतीच्या बाल्कनीत गेला. मात्र जीव वाचवण्यासाठी एका बाल्कनीतून दुसरीकडे जाण्याच्या नादात हात सुटून तो थेट खाली कोसळला. दुर्दैवाने जमिनीवर पडून त्याला प्राण गमवावे लागले.
करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. 19 व्या मजल्यावर आग लागल्यानंतर विसाव्या मजल्यापर्यंत पसरली. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आग नेमकी कुठल्या कारणामुळे लागली, ती कशी पसरली, याविषयी अधिकृत माहिती अद्याप समोर आलेलं नाही.
Read Also :
- माजी आमदार विलास लांडेंचा समंजसपणा; आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित गव्हाणेंचे गुडघ्याला बाशिंग
- कोरोना लसीचे १०० कोटी डोस खरोखरच दिले गेलेत का? संजय राऊतांचा सवाल
- एक म्हणतो 25 हजार कोटींचा घोटाळा, दुसरा म्हणतो 10 हजार कोटींचा घोटाळा; अजित पवार भडकले
- १०० कोटी डोस हा केवळ एक आकडा नाही, हे देशाच्या सामर्थ्यांचं प्रतिबिंब : पंतप्रधान नरेंद्र मोदी
- संजय राऊतांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा उतरली नसेल; चित्रा वाघ भडकल्या