मुंबई : गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरावा, अन्यथा हनुमान चालिसा लावण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या आव्हांना प्रतिसाद देत राज्यात काही ठिकाणी मंदिरांवर हनुमान चालिसा लावण्यात आली. तर पुण्यात या संदर्भात पुणे शहराध्यक्ष वसंत मोरेंनी बंडाची भूमिका आपल्याला प्रभागात शांतता ठेवावी असं सांगितलं होतं. त्याचाच परिणाम म्हणून मनसेतून वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं आहे. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. तर यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी वसंत मोरेंची राजकीय हत्या झाली असल्याचं म्हटलं आहे. तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्यांना राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.
वसंत भाऊ तुमची हत्या केली की, आत्महत्या हे सर्व महाराष्ट्र पाहत आहे; रूपाली पाटलांची प्रतिक्रिया
प्रशांत जगताप म्हणाले की, वसंत मोरे हे जर राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये येणार असेल तर त्यांचं मी पक्षात स्वागत करणार. वसंत मोरे यांच्यासारख्या नेत्यांचं मी कालही स्वागत केलं आहे. त्यांनी कालच याबाबत निर्णय घेतला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. असंही ते म्हणालेत. मात्र वसंत मोरे यांनी आपली भूमिका मांडताना मनसेत राहणार असल्याचं सांगितलं आहे.
खरा मावळा! गेल्या 27 वर्षापासून साहेबांसोबत आहे आणि पुढेही राहणार; वसंत मोरे
मनसेच्या अंतर्गत खेळीमुळे त्यांचं शहराध्यक्ष पद गेलं आहे. मी देखील राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करताना मला देखील या राजकारणाला तोंड द्यावं लागलं. त्यामुळे वसंत भाऊ तुमची हत्या केली आत्महत्या हे सर्व महाराष्ट्र पाहत आहे. अंसही त्या म्हणाल्यात वसंत मोरे बोलताना म्हणाले की, मनसे आणि राज ठाकरे साहेब माझ्या मनात कायम आहे. मनसे सोडण्याचा विचार अजून माझ्या मनात आलेला नाही आहे. ज्यावेळी मनात विचार आला त्यावेळी मी सर्वांसमोर सांगेन. तसेच गेल्या काही दिवसापासून माझं अनेक नेत्यांशी संपर्क होत आहे. माझं वय 47 आहे आणि गेल्या 27 वयापासून मी राज ठाकरे यांच्यासोबत आहे आणि पुढेही राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
भाजपच्या जवळ जो व्यक्ती, पक्ष गेला, तो संपला! रोहित पवारांचा राज ठाकरेंना सल्ला
दरम्यान, वसंत मोरे यांच्या जागी आता साईनाथ बाबर यांची मनसे पुणे शहर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. राज ठाकरेंवर नाराजी व्यक्त करत पुण्यात मुस्लिम कार्यकर्त्यांनी देखील राजीनामे दिले आहेत. त्यामुळे वसंत मोरे यांच्या हाकालपट्टीमुळे आता मनसेला गळती लागली आहे. तसेच सकाळी वसंत मोरे हे मनसेच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून देखील लेप्ट झाले होते. त्यामुळे वसंत मोरे आता काय भूमिका घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “दादा..! जिथे कुठे असाल तिथून परत या ;” चंद्रकांत पाटलांच्या आठवणीत कोथरुडकरांची बॅनरबाजी
- कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? नारायण राणेंचा संजय राऊतांवर घणाघात
- “ते आम्हाला ठार मारतील, त्याची तयारी आहे, मात्र पुढील 25 वर्ष भाजप सत्तेत येणार नाही”
- अभिनेत्री आसावरी जोशी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; अजित पवार यांची उपस्थिती
- बकरी, वाघाच्या लढाईत बकरीला वाचवणं गरजेचं! एसटी कर्मचाऱ्यांना आता २२ एप्रिलची दिली तारीख