IMPIMP
Otherwise, we will make this government a state of affairs. Sena MLAs and MPs warn the state government Otherwise, we will make this government a state of affairs. Sena MLAs and MPs warn the state government

“अन्यथा..! या सरकारची दे माय, धरणी ठाय अशी अवस्था करू”

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या काही निर्णयांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीस्थगिती दिली आहे. यामध्ये औरंबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. यावरून आता शिवसेनेचे नेते आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. यामध्ये चार दिवसात निर्णय घ्या. अन्यथा आंदोलन करू असा इशारा औरंगाबादचे आमदार अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.

“सध्या दोन जणांचे मंत्रीमंडळ असून दोघेच महाराष्ट्राचे मालक”; अजित पवारांचा खोचक टोला 

एकनाथ शिंदे यांनी नामांतराला स्थगिती देणं निषेधार्ह आहे. संभाजीनगरचं नाव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं आहे.  उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटच्या बैठकीत काॅंग्रेस राष्ट्रवादी सोबत असताना निर्णय घेतला आहे. त्यामुळे आताच्या सरकारने या निर्णयाला स्थगिती देणं अत्यंत दैर्दैवी आणि चुकीचं आहे. मी सरकारला आव्हान देतोय की, येत्या बैठकीत पुन्हा नामांतराचा प्रस्ताव आला पाहिजे किंवा यावरिल स्थगिती उठवली पाहिजे.

“..लवकरच शिल्लक यात्रा काढा”; मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला 

कोणत्याही परिस्थितीत शहराचं नाव संभाजीनगर झालंच पाहिजे. जे काम कुणाला शक्य झालं नव्हतं. ते उद्धव ठाकरे यांनी करून दाखवलं आहे. स्वत: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या काळात या सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला नव्हता. पंरतु काॅंग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या वेगवेगळ्या विचारसरणीतील महाविकास आघाडी सरकारने संभाजीनगरच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. असंही ते म्हणाले.

“उद्धव ठाकरेंनी घेतलेले चुकीचे निर्णय थांबवले जातील”; नामांतराच्या निर्णयावरून सत्तारांची प्रतिक्रिया 

मात्र याचं श्रेय उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला मिळेल, हे पाहून ते लाटण्यासाठी या ठरावाला स्थगिती आणली, असं आमचं मत आहे. ही स्थगिती लवकरात लवकर उठवावी. नाही तर शिवसेना रस्त्यावर या सरकारची दे माय, धरणी ठाय अशी अवस्था करेल असा इशारा देखील अंबादास दानवे यांनी दिला आहे. तसेच शिंदे सरकारने नामांतराची स्थगिती दिली लवकरात लवकर उठवावी. तसेच एका महिन्याच्या आत केंद्रातून हा प्रस्ताव मंजूर करून आणावा, अन्यथा आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

Read also