मुंबई : नरेंद्र मोदी यांनी पतंप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यांची अच्छे दिन ची घोषणा संपुर्ण जगभरात प्रसिद्ध करून विरोधकांनी त्यांना यावरून चांगलचं कोंडीत पकडलं. त्यातच आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीने बेरोजगारीच्या मुद्यांवरून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
“लाखो नोकऱ्या, महागाईचा भडका, यालाही विपर्यास म्हणणार का?”रोहित पवारांचं फडणवीसांना सवाल
स्वांतत्र्यांच्या 72 व्या सालाप्रमाणे राज्यात 75 हजार उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याचा संकल्प भाजपने केला आहे. त्याचबरोबर देशात उमेदवारांना रोजगार मेळावे भाजपकडून आयोजित केले जात आहेत. त्यावरूनच राष्ट्रवादीने भाजपला लक्ष्य केले आहे. मालक निदान एक लाखाचा आकडा तरी पुर्ण करा. असं म्हणत या गतीने दोन कोटी रोजगार जन्मात तरी मिळतील का : असा उपरोधिक सवाल राष्ट्रवादीने केला आहे.
आदित्य ठाकरेंचं वरळीकरांना भावनिक पत्र…! म्हणाले, “तुमचे आशीर्वाद अन् प्रेम मला…”
तसेच पुढे प्यारे देशवासियों, देशात 2014 पासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारने नागरिकांना दिलेली आश्वासनं लहान मुलांपासून वृद्धांपर्यत सर्वांना तोंडपाठ झाली आहेत. त्यापैकी दोन कोटी रोजगाराचे स्वप्न रंगलवलेल्या मोदी सरकारने लाजेखातर निदान एक लाखाचा आकडा तरी पुर्ण करायचा होता. मागील आठ वर्षांच्या कार्यकाळात दोन कोटीप्रमाणे एकूण 16,00,00,000 इतकी रोजगार निर्मिती अपेक्षित होती. मात्र टप्प्यटप्प्याने भरती प्रक्रिया करून देखील रोजगार एक लाखापर्यंत पोहचत नाही ही मोदी सरकारची नामुष्की म्हणावी लागेल असा टोला देखील त्यांनी लगावला.
“हिवाळी अधिवेशनापुर्वी राज्य मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता”?
या गतीने मोदी सरकारचा कारभार चालत राहिला तर युवकांना दोन कोटी रोजगार पुढच्या जन्मात तरी मिळतील का हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे देशात योग्य रोजगार निर्मिती होण्यासाठी 2024 मध्ये सक्षम सरकारची निर्मिती करण्याची जबाबदारी आता सुजाण मतदाराची आहे. असंही ते म्हणाले.
Read also
- “हा गरीब बिचारा मारला जाईल अन् वरचे अधिकारी..” आव्हाडांचं त्या प्रकरणावर भाष्य
- “तर त्यांनी स्वत; च्या बुद्धीबाबत विचार करावा;” भाजपच्या प्रवक्त्यानी उलट विरोधकांना सुनावलं
- “हे सरकार 100 टक्के पडतंय, माझ्याकडे पुर्ण माहिती अन् खात्री”; संजय राऊतांचं सुचक वक्तव्य
- “राज्यपालांच्या वक्तव्याचा सगळ्याच नेत्यांकडून निषेध..! भाजप नेते कुठंय?”
- “प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणुस ;” शिंदे गटाच्या आमदाराचं सुळेंकडून कौतुक