पुणे: भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या चांगलाच संघर्ष सुरु आहे. आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमैया हे शिवसेना नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुण्यात आले होते. यामध्ये शिवसैनिक आणि किरीट सोमैया यांच्यात झटपट झाली आणि त्यांना चांगलाच मार लागला. काल शिवसेनेला जशास तसे उत्तर देण्यासाठी पुणे भाजपकडून ज्या ठिकाणी हे प्रकरण झाले होते तिथंच किरीट सोमैयांचा सत्कार सोहळा ठेवण्यात आला होता.
किरीट सोमय्यांवर सूड उगवला गेलाय, आम्ही सहजासहजी घेणार नाही – चंद्रकांत पाटील
शहराध्यक्ष जगदीश मुळीकांसहित सर्वच भाजप कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. पुणे महानगरपालिकेने सुरुवातीला या सत्कार सोहळ्याला परवानगी नाकारली होती. यावेळी सत्कार झाल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमैयांनी महाविकास आघाडी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. ऑर्थर रोड कारागृहात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शेजारी असलेली कोठडी सॅनिटाईझ करून ठेवायला सांगा. त्या ठिकाणी मंत्री अनिल परब आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची जागा नक्की आहे आणि त्यांना तिथं जावंच लागणार आहे असा इशारा भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी दिला आहे.
मोठी बातमी: राज्यातील १० महापालिकेच्या निवडणूका पुढे जाणार? मार्च-एप्रिल ऐवजी जुन-जुलैमध्ये?
सोमैयांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ माजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खासदार संजय राऊत व परिवहनमंत्री अनिल परब यांची स्वत:ला वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे .मात्र, भ्रष्टाचाराचे पुरावे इतके प्रचंड आहेत की त्यांना कुणीही वाचवू शकणार नाही. मात्र, यातून वाचण्याचा प्रयत्न दोघांकडूनही सुरू असून माझ्यावर करण्यात आलेला हल्ला या कारस्थानाचा एक भाग आहे असा आरोपही किरीट सोमैया यांनी राऊत आणि परबांवर केला आहे.
Read also:
- ठाकरे-पवारांचा मुंबईत सकाळी सकाळी वजनदार दौरा; मिशन मुंबईची जोरदार तयारी
- गोव्यात काँग्रेस नेते फक्त पर्यटनासाठीच यायचे – मोदी
- नुसती उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नका; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला
- ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेक लोकांचा बीपी वाढेल; नितेश राणेंचा हल्लाबोल
- हिंगणघाट जळीतकांड प्रकरण: तरुणीला जिवंत जाळणाऱ्या नराधमाला अखेर जन्मठेपेची शिक्षा