पंढरपुर : मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच गाजत आहे. येत्या २० जानेवारीरोजी मनोज जरांगे पाटील मुंबईत आरक्षणासाठी उपोषण करणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणासाठी ओबीसी नेतेही मैदानात उतरले आहेत. यातच आज पंढरपुरात ओबीसी नेत्यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत मराठ्यांचं आंदोनल अरबी समुद्रात बुडवून टाकू असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिलाय. त्यामुळे मराठा आरक्षण विरूद्ध ओबीसी आरक्षणाचा विषय राज्यात आणखी तापू लागला आहे.
हेही वाचा..“हेच दिल्लीश्वरांना सतत खुपत आलंय”, राज ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल
आम्ही ओबीसी म्हणून एकत्र झालो आहे. त्यामुळे मराठ्यांचं आंदोलन आम्ही सहजपणे अरबी समुद्रात बुडवून टाकू असे प्रकाश शेंडगे म्हणाले. तसेच आपल्याकडे कोयता, परशू आणि काठी आहे. त्यामुळे काळजी करू नका. असंही त्यांनी सांगितले. तसेच १० लाख गाड्या. २०० जेसीबीने फुले उधळायला. हेलिकॉप्टरने फुले उधळणारा समाज गरी आहे म्हणे. असली गरीबी आम्हालाही येऊ दे. असे साकडे मी पांडुरंगला घालतो. असेही ते म्हणाले.
हेही वाचा..“हेच दिल्लीश्वरांना सतत खुपत आलंय”, राज ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल
पुढे बोलतांना ते म्हणाले की, ७५ वर्षे सत्तेत बसलेले नाग आहेत. त्यांनी तुम्हाला गरीब बनवले आहे. तुम्हीच सत्तेत आहात.. त्यामुळे त्या जाणत्या राजांना विचारा की सोलापुर जिल्ह्यात सगळे आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य मराठा आहेत. यापुढच्या काळात आता ओबीसी नेत्यांना निवडून द्या. असे आवाहनही प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी कार्यकर्त्यांना केले.
READ ALSO :
हेही वाचा..“ओबीसींना खिंडित गाठलंय, शिंदे समिती बरखास्त करा,” गोपीचंद पडळकरांचा सरकारला घरचा आहेर
हेही वाचा..मुन्ना पोळेकराला मोहरा बनवला, ‘शरद मोहोळ’ हत्या प्रकरणाचा खरा मास्टर माईंड आला समोर
हेही वाचा…लोकसभेच्या ४८ जागांपैकी मनसेच्या १४ उमेदवारांची यादी जाहीर ; राज ठाकरेंचे शिलेदार अनेकांना धक्का देणार
हेही वाचा..मावळात पार्थ पवार तर शिरूरमधूनही आपला उमेदवार असणार, मग शिंदे जाहीर सभा का घेताहेत? अजित पवार म्हणाले….
हेही वाचा…तळ कोकणात जागावाटपावरून महायुतीत राजकीय शिमगा ; सिंधूदूर्ग-रत्नागिरी लोकसभेवरून मोठी रस्सीखेच