पुणे : पुण्यासह महाराष्ट्रातील कोरोनारुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसातील दुसऱ्या लाटेचा वेग आता कमी होत चालल्याचे दिसत आहे. यातच राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी देखील या व्हायरसच्या विळख्यात सापडत आहे. आता पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
सौरभ राव यांना दोन महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांना लसीचा दुसरा डोस घेतला होता. मात्र लस घेतल्यानंतर त्रास जाणवू लागल्याने चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
16 मार्च 2021 रोजी सौरभ राव यांना कोरोनाची लागण झाली. कोरोना लसीकरणाचा पहिला डोस झाल्यानंतर राव यांना ही लागण झाली होती. पुणे विभागाचे आयुक्त असल्याने विभागातील सर्व पाच जिल्ह्यातील कोरानाची स्थिती हाताळण्यात राव महत्वाची भूमिका पार पाडत आहेत.
शुक्रवार उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर राव यांनी लसीचा दुसरा डोस घेतला होता. लसीकरण झाल्यानंतर राव यांना त्रास होण्यास सुरुवात झाली. आता लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Read Also :
- ‘मी गोमूत्र पिते, त्यामुळे मला कोरोना झाला नाही’
- ‘कोव्हॅक्सिन’चा प्रकल्प विदर्भातून पुण्याला पळवला ? अजित पवार म्हणाले…
- ‘म्युकरमायकोसीस’ रुग्णांच्या औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
- कुस्तीपटूच्या मृत्यू प्रकरणी ऑलिम्पकविजेता सुशील कुमार फरार, एक लाख रुपयांचे इनाम जाहीर
- ‘या माणसाचा कचरा करायला शब्दच नाहीत’