भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली. आगामी लोकसभा निवडणुकांना एक ते सव्वा वर्षाचा कालावधी शिल्लक असल्याने रिक्त झालेल्या पुणे लोकसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता जास्त आहे. भाजपकडून दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी खासदार संजय काकडे आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावांची चर्चा सध्या सुरू आहे.
हेही वाचा… राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा शपथविधी होणार?
दुसरीकडे महाविकास आघाडीत निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच जागा मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे लोकसभेची जागा आघाडीत सुरुवातीपासून काँग्रेसकडे राहिलेली आहे. माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी अनेक वर्ष येथून विजय मिळवला. मात्र कलमाडी नावाचा करिष्मा संपल्यानंतर गेली दहा वर्षापासून भाजपचे उमेदवार येथून विजयी झाले आहेत. पुणे महापालिकेची सत्ता अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. 2014 पर्यंत शहरात राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या देखील जास्त होती. असं असताना देखील लोकसभेचा मतदारसंघ मात्र काँग्रेसकडे असल्याने राष्ट्रवादीतील नेत्यांच्या मनात कायम ही सल राहिलेली आहे.
आता पोटनिवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सोशल मीडिया तसेच नेत्यांच्या वक्तव्यातून थेट लोकसभा मतदारसंघावर दावा केला जातोय. दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख असलेले पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. एका बाजूला दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतरच्या सर्व विधी पूर्ण होईपर्यंत, आम्ही कोणतीही चर्चा करणार नाही, असा पवित्रा पक्षाच्या स्थानिक तसेच राज्यातील नेत्यांनी घेतला होता. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी बापट यांच्या निधनानंतर निवडणुकीविषयी वक्तव्य केल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. आता मात्र कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्या पक्षाकडे ही जागा घेण्यासाठी चर्चा घडवली जात आहे.
हेही वाचा… “याचा परिणाम…”; राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना माध्यमांनी विचारला असता, त्यांनी देखील पुणे लोकसभेची जागा आपल्याकडे असावी, अशी कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची भावना असल्याचे सांगितलं. तसेच प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्याचा आग्रह कार्यकर्त्यांकडून केला जात असल्याचं देखील ते म्हणाले. हे सर्व चित्र पाहता पोटनिवडणुकीत पुण्याची जागा मिळवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच रस्सीखेच होणार हे मात्र नक्की.
Read also
हेही वाचा… मोठी बातमी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची 1 मे रोजी हत्या करणार
हेही वाचा… 15 आमदारांसह भाजपमध्ये जाणार? अजित पवार म्हणाले..
हेही वाचा… ईडीचा पवार दाम्पत्याला दिलासा; अजित पवार, सुनेत्रा पवारांची नावं आरोपपत्रातून वगळली
हेही वाचा… उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर आले होते कारण..; शरद पवारांचा खुलासा