राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून घडामोडींचा वेग आला आहे. त्यातच महाविकास आघाडीतील धुसफूस अजून वाढताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर जाऊन त्यांची भेट घेतली आहेत. या भेटीवेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत उपस्थित होते.
हेही वाचा… “माझ्या वक्तव्याचा ध चा म केला गेला”; चंद्रकांत पाटलांचा रोख नक्की कुणावर?
तसेच या भेटीसंबधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार बोलताना म्हणाले की, आज महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्यांनी एका विचाराने चालावं, काम करावं अशी या भेटीमध्ये चर्चा झाली असं शरद पवार म्हणाले.
तर काल झालेल्या या भेटीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, या बैठकीमध्ये राज्यातील आणि देशातील अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. भविष्यातील दिशा ठरवण्यावर चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाली, शरद पवार देशाचे जेष्ठ नेते आहेत. या बैठकीत सुप्रिया सुळे देखील होत्या, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
Read also
हेही वाचा… राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा शपथविधी होणार?
हेही वाचा… “याचा परिणाम…”; राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा… सर्वात मोठी बातमी, हसन मुश्रीफ यांना मुंबई सत्र न्यायालयाचा सर्वात मोठा झटका..!
हेही वाचा… शरद पवारांचा उद्धव ठाकरेंवर रोष?; “आम्हाला विचारत घेतलं नाही”, म्हणत व्यक्त केली खंत