पुणे : एकीकडे कोरोनारुग्णांची संख्या कमी होत असताना आता रुग्णांना म्युकरमायकोसीस आजाराची लागण होत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात या आजाराची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. राज्य सरकारकडून या रुग्णांवर मोफत उपचार करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुणे महापालिकेने देखील अशा रुग्णांना ३ लाख रुपयांपर्यंतची मदत करणार आहे.
पुणे महापालिका म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी ३ लाख रुपयांपर्यंत मदत करणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
#IMP | 'म्युकरमायकोसिस'वर शहरी गरीब योजनेतून उपचार !
कोरोनातून बरे झाल्यानंतर आता म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळत असून यावरील उपचारही महागडे आहेत. यावर उपचार घेणे सर्व सामान्य रुग्णाला परवडावे म्हणून आपल्या शहरात म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारांचा समावेश शहरी गरीब योजनेत केला आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 18, 2021
कोरोनातून बरे झाल्यानंतर आता म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळत असून यावरील उपचारही महागडे आहेत. यावर उपचार घेणे सर्व सामान्य रुग्णाला परवडावे म्हणून आपल्या शहरात म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारांचा समावेश शहरी गरीब योजनेत केला असल्याचे त्यांनी सांगितले.
आजपर्यंत महापालिकेच्या माध्यमातून १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य संबधित रुग्णांच्या बिलावर शहरी गरीब योजनेतून दिले जात होते. मात्र आता म्युकरमायकोसिस या नव्या आजाराचा यात समावेश करुन म्युकरमायकोसिसच्याच उपचारांसाठी ही मर्यादा १ लाखांवरुन ३ लाख रुपयांपर्यंत वाढण्यात आल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
Read Also :