पुणे : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेसनात मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पुण्यातील रखडलेला विमानतळाचा मुद्दा उपस्थित केला. याबाबत श्रीरंग बारणे यांनी हिंदीतून प्रश्न विचारला असता. त्यावर केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी चक्क मराठीतून उत्तर दिल्याने सभागह अवाक् झाले. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
हेही वाचा…महाराष्ट्र हादरलं…! ठाकरे गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून ह’त्या’, आरोपींनीही स्वत: ला संपवलं
पुणे जिल्ह्यातील एकमेव लोहगाव येथील लष्करी विमानतळामुळे विमानांच्या उड्डाणांना काही निर्बंध आहेत. दुसरीकडे वाढत्या नागरिकीकरणामुळे दुसऱ्या विमानतळाची गरज भासू लागली आहे. त्याकरिता खेड तालुक्यात चाकण, चांदुस, सेझ अशा तीन जागा शोधण्यात आल्या होत्या. परंतु तेथील भौगोलिक परिस्थिती अनुकूल नसल्याने आणि इतर कारणामुळे हा संभाव्य विमानतळा तेथे होऊ शकला नाही. त्याचा विचार पुरंदर येथे करण्याचा विचार आहे. त्यावर ज्योतिरादित्य शिंदे यांनी मराठीतून उत्तर दिले.
हेही वाचा…“..म्हणून काँग्रेस पक्ष सोडला”, बाबा सिद्दीकींनी सांगितलं कारण, ‘त्या’ पक्षाची ताकद वाढवणार
दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांचे घराणे मुळचे महाराष्ट्राचे असून त्यांना पुणे शहराविषयी खुप प्रेम असून ते गुरूवारी पुन्हा एकदा सभागृहात दिसले. खासदार बारणे यांनी प्रश्न विचारताच त्यांनी त्याबाबत एकदा धन्यवाद दिले. तर पुण्याचा विकास हा माझा, आमचा संकल्प असून नव्या विमानतळासाठी राज्य सरकारने फक्त नवी जागा सुचवावी, पुढील कार्यवाही करतो असे ठाम आश्वासन दिले.
आज लोकसभेत पुणे विमानतळाच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला. पुणे विमानतळावर सहसा भारतीय वायुसेनेची रेलचेल असते. त्यामुळे पुण्यात कोणत्या इतर ठिकाणी विमानतळ उभारण्याचा विचार सरकारच्या मनात आहे का ? असा प्रश्न केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया… pic.twitter.com/PDX7ty8Sxa
— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) February 8, 2024
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभेसाठी ठाकरेंच्या ‘या’ ११ शिलेदारांचं नाव जवळपास निश्चित, शिंदे अन् भाजपला धोबीपछाड देणार
हेही वाचा…“तीन चाकी सरकारची कामगिरी छान, आज झाला बिहार उद्या होईल अफगाणिस्तान “
हेही वाचा…शिरूर लोकसभेसाठी अमोल कोल्हे, तर हडपसर विधानसभेत जगताप ? शरद पवार गटाने कंबर कसली
हेही वाचा…“मोदींचा जन्म ओबीसी समाजात नाही तर तेली समाजात झाला,” राहुल गांधीचं वक्तव्य, भाजपा राज्यभर आंदोलन करणार
हेही वाचा…कोण आहे मॉरिस नरोन्हा ? फेसबुक लाईव्हमध्येच ठाकरे गटाच्या नेत्याला संपवलं, घटनेचा थरारक CCTV व्हिडीओ