मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवकर अभिषेक घोसाळकर यांची गोळी घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरूवारी दहिसर येथे फेसबुक लाईव्ह करत असताना मॉरिस नरोन्हा उर्फ मॉरिस भाई या व्यक्तीने घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात गोळीबाराच्या घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह गेल्यानंतर आता पक्षाचा निधीही जाणार ? शरद पवार गटाला धक्का बसणार ?
अभिषेक घोसाळकर यांची वैयक्तिक वादातून मॉरिस भाई या व्यक्तीने गोळी झाडून हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपुर्वी कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे.
हेही वाचा…“राज्यात सध्या पुतण्यांचे दिवस..!” राज्यात आणखी एका ‘काका पुतण्यात’ रंगलं राजकारण
दरम्यान, बोरिवली आयसी कॉलिनीतील मॉरिसच्या कार्यालयात दोघांनी फेसबुक लाईव्ह केले आणि त्यातून वाद मिटवून आम्ही पुन्हा एकत्र आल्याचे जाहीर केले. त्यानंतर काही क्षणात मॉरिसने घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने स्वत: वरही गोळी झाडली. घोसाळकर यांना बोरिवली येथीस खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबार प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस पथके स्थापन करण्यात आली आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“..म्हणून काँग्रेस पक्ष सोडला”, बाबा सिद्दीकींनी सांगितलं कारण, ‘त्या’ पक्षाची ताकद वाढवणार
हेही वाचा…शिवसेना पक्ष सोडा, पक्षांतर करा, नाहीतर तुरूंगात जा,” ठाकरे गटाच्या माजी मंत्र्याला शिंदे गटाच्या धमक्या
हेही वाचा…“पुण्यात अजित पवार गटाने कार्यालयावर ताबेमारी केली तर..” जयंत पाटलांनी दिला थेट इशारा
हेही वाचा…“शिंदे गँग च्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा”, राऊतांचे सलग चार दिवस ट्विटवॉर
हेही वाचा….“राजकारणात बाप बदलण्याची नवीन पद्धत आली”, शरद पवार गटाचा जोरदार घणाघात