नागपूर: नागपूरच्या संघ मुख्यालयाजवळ भाजप- काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याची घटना घडली आहे. नागपूर येथील संघ मुख्यालयाजवळ भाजप- काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर येऊन आपापसात भिडले. स्थानिक काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके यांनी महागाई, बेरोजगारी विरोधात काढलेली बाईक रॅली संघ मुख्यालयाजवळून नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचे प्रयत्न केला.
हे पण वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी
मात्र काँग्रेस कार्यकर्ते त्या अरुंद गल्लीतून रॅली नेण्यावर अडून राहिल्यामुळे तिथे तणाव निर्माण होऊन शाब्दिक वादावादी व धक्काबुक्की झाली. खरं तर विशेष सुरक्षा व्यवस्था असलेल्या या परिसरात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडल्यानंतर पोलीस ही तिथे पोहोचले. त्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना मागे हटवण्यात आलं.
काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक बंटी शेळके यांनी महागाई व अन्य केंद्र सरकारविरोधी मुद्द्यांवर एक रॅली काढली होती. संघ मुख्यालयाचा परिसर हा दाटीवाटीचा असून, सुरक्षेच्या कारणास्तव तिथे वाहतुकीवर अनेक निर्बंध आहेत. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिथूनच रॅली नेण्याचा हट्ट धरला. त्यावर तेथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी यास विरोध दर्शवला आणि त्यामुळे वाद निर्माण झाला व दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते भिडले असं सांगण्यात आलं आहे.
तर, परिस्थितीचं गांभीर्य पाहून घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी वाद मिटवण्यासाठी हस्तक्षेप केला आणि पोलिसांची जादा कुमकही मागवली. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून मागे जावं लागलं. असं देखील सांगण्यात आलं आहे.
Read Also :
आमचा पक्ष मारझोड करणारा पक्ष नाही ; दरेकरांचा शिवसेनेवर टीका
- आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही; देवेंद्र फडणवीस म्हणतात….
- मुंबईतील मराठी आवाज टिकला आणि दिसला पाहिजे, बीडीडी’ पुनर्विकासप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार यांचे आवाहन
- विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस राज्यसरकार जबाबदार, एमपीएससीच्या जागेवरुन विद्यार्थी आक्रमक
- “सेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जावं लागेल’’ सामनातून भाजप आमदारावर टीका